HOME   महत्वाच्या घडामोडी

आज लातुरात एरोमॉडेलिंग, लातुरात अपघात एक ठार , मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चा, सलमान घरी परतला, राजकारणात कुत्रे-मुंगूस-साप.....०८ एप्रिल २०१८

आज लातुरात एरोमॉडेलिंग, लातुरात अपघात एक ठार , मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चा, सलमान घरी परतला, राजकारणात कुत्रे-मुंगूस-साप.....०८ एप्रिल २०१८

* सकाळी फिरताना लातूर तहसीलजवळ अज्ञात वाहनाची धडक, बन्सीलाल भराडिया यांचे निधन, हरिप्रसाद भराडिया गंभीर जखमी
* आज लातुरच्या साई रोडला एमआयटीतर्फे दुपारी ०४ ते ०७ या वेळेत एरोमॉडेलिंग शोचे आयोजन
* लातूर पोलिस दलातील जगन्नाथ सूर्यवंशी, विद्याधर टेकाळे आणि उत्तम जाधव यांना राष्ट्रपती पदके प्रदान
* जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला घंटानाद
* लातुरच्या महाराष्ट्र नागरी बॅंकेने उद्योगिनी योजनेतून ३०० कुटुंबांना दिले कर्ज
* लातूर जिल्ह्यात सावकारीसाठी ४४९ जणांनी केले अर्ज दाखल
* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी किरण चव्हाण
* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली क्रीडा संकुलाची पाहणी
* लातूर जिल्ह्यात झाला विजांच्या कडकडाटांसह १५-२० मिनिटे अवकाळी पाऊस
* आरवाय शेख यांची लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी निवड
* सलमान खान सुटल, शिक्षेला स्थगिती, घरीही परतला
* पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगरमध्ये गोळीबार, सेनेच्या दोघांची हत्या, सेनेची आज नगर बंदची हाक
* परळीत जुन्या भांडणातून योगीराज यादव यांची जाळून हत्या
* सेनेबरोबर जायचे की नाही, हे भाजपने ठरविण्याची वेळ निघून गेली, भाजपचे शक्तिप्रदर्शन हे ‘विचार हरवलेला मेळावा’- संजय राऊत
* कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची ट्रायल आज होणार कोल्हापूर विमानतळावर
* नाशिक महानगरपालिका पोटनिवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले विजयी
* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची बाजी
* धोक्याची घंटा वाजू लागल्याने भाजपच्या सेनेसमोर पायघडय़ा- राष्ट्रवादीचे सुनील तटकरे
* राज्यातील विद्यापीठाच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत कुलगुरूंनी अधिकाधिक योगदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
* मुंबई विद्यापीठाने ३० परीक्षांचे वेळापत्रक ढकलले पुढे
* भाजपाने विरोधकांना साप, मुंगूस, कुत्रा संबोधून आपली वैचारिक पातळी खालावल्याचे दाखवून दिले- अशोक चव्हाण
* धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या भरपाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची चौकशी समिती
* नववीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वर्षापासून जूनमध्ये देता येणार फेरपरीक्षा
* डेबिट, क्रेडिट कार्ड वापरून हवाला व्यवहार केल्याचे उघड, मुंबईत विमानतळावर ११ जणांना अटक, ५५ डेबिट, क्रेडिट कार्डे जप्त
* नवी मुंबई गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर बेपत्ता
* मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा काढणार- इतिहास संशोधक वसंतराव मोरे
* दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात अवयवदानाच्या धड्याचा समावेश
* नागपूरमध्ये विहिरीतून पाण्याची मोटार काढताना तीन कामगारांचा मृत्यू
* सलमान खानच्या वांद्रे येथील त्याच्या घराबाहेर फॅन्सची गर्दी
* नागपूर येथील बालसुधारगृहातून पाच मुलांचे वॉर्डनच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पलायन
* दहावीच्या पुस्तकात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यावर धडा
* दादासाहेब फाळके यांची नाशिकला असलेली गाडी ताब्यात घेण्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे आदेश
* घरफोडीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या दोघांचा पुण्यात पोलीस स्टेशनमधील स्वच्छता गृहात आत्महत्येचा प्रयत्न
* अमित शाह यांनी विरोधकांबाबत काढलेले उद्गार सडक्या मनोवृत्तीचे प्रदर्शन- राहूल गांधी
* नरेंद्र मोदींना घाबरल्यामुळे कुत्र्या-मांजराप्रमाणे, साप-मुंगसाप्रमाणे लढणारे विरोधकही एकवटलेत- अमित शहांची होती टिका
* आसाराम बापूंच्या खटल्याचा निकाल २५ एप्रिलला
* राहुल गांधी यांना राज्यातील जिल्हानिहाय अहवाल पाठविल्यानंतरच राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीचा निर्णय - अशोक चव्हाण
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन पाळले नाही तर भाजपविरोधात लढवणार निवडणुका - चंद्राबाबू नायडू
* आंध्रप्रदेशचा विकास करण्याचं आश्वासन दिल्यामुळेच भाजपासोबत युती केली- चंद्राबाबू नायडू
* साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच भेटणार पंतप्रधानांना
* कुमार विश्वास यांच्याविरोधातील अरुण जेटली यांची अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी ११ मे रोजी
* सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी हिमाचल प्रदेशमधून शिक्षक, क्लर्क आणि सहायक कर्मचाऱ्याला अटक
* काठमांडूशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी भारत-नेपाळमध्ये करार
* नेपाळच्या पंतप्रधानांनी भारत-नेपाळ पेट्रोलियम प्रोडक्ट पाइपलाइनचं केलं उदघाटन
* उज्जैनमध्ये पाटीदारचे हार्दिक पटेल यांच्यावर शाई फेकणारा पाटीदार समाजातील तरुणास अटक
* राष्ट्रकुल स्पर्धा: वेटलिफ्टिंगमध्ये वेंकट राहुलला सुवर्णपदक


Comments

Top