HOME   महत्वाच्या घडामोडी

शौचालय बंद सीसीटीव्ही चालू, कॉंग्रेसचे उपोषण, महिला तंत्रनिकेतन राहणार जिवंत, प्लास्टीक साठा संपवा, एसटी निवृत्तांना रोजगार, हवा स्वतंत्र गृहमंत्री.....०९ एप्रिल २०१८

शौचालय बंद सीसीटीव्ही चालू, कॉंग्रेसचे उपोषण, महिला तंत्रनिकेतन राहणार जिवंत, प्लास्टीक साठा संपवा, एसटी निवृत्तांना रोजगार, हवा स्वतंत्र गृहमंत्री.....०९ एप्रिल २०१८

* लातुरचे महिला तंत्रनिकेतन बंद होणार नाही
* तंत्रनिकेतनच्या विद्यार्थीनींनी मानले पालकमंत्र्याचे आभार, केला सत्कार
* पालकमंत्री संभाजी पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसमवेत केली क्रीडा संकुलाची पाहणी, सुविधा-असुविधांचा आढावा
* प्लास्टीक, थर्माकोल, अविघटनशील पदार्थांच्या विक्री, साठा व वापरावर बंदी, लातूर मनपाकडून दंडाची तंबी
* महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे १२ तारखेला लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व्याख्यान
* लातुरच्या गांधी चौकात सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे लाक्षणिक उपोषण, राहुल गांधीही करणार दिल्लीत उपोषण
* प्लास्टीक आणि थर्माकोलचा साठा महिनाभरात संपवण्याचे लातूर महानगरपालिकेचे आदेश
* हाळी हंडरगुळीत भाव न मिळाल्याने शेतकर्‍याने वाटले मोफत टोमॅटो
* लातूर जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस, पीक-फळांचे नुकसान, काल ४५ मिनिटे झाला पाऊस
* चाकूरच्या बसस्थानकात लागले सीसीटीव्ही पण शौचालय अनेक महिन्यापासून बंद!
* नगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून दहशत माजवण्याचा प्रकार, नगरचा उत्तर प्रदेश झाला,मुख्यमंत्रीच या घटनेला जबाबदार- रामदास कदम
* आज मुख्यमंत्र्यांना भेटून नगरमधील पोलिसांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करणार- रामदास कदम
* बलात्काराच्या घटनेची तक्रार विलंबाने केली म्हणजे खोटेपणा नाही- उच्च न्यायालय
* राज्‍याला स्‍वतंत्र गृहमंत्री हवा, अनेक सक्षम लोक पक्षात असताना मुख्‍यमंत्र्यांचा या पदासाठी अट्टाहास का?- राधाकृष्ण विखे पाटील
* एसटी महामंडळ घेणार निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत, ५०० जणांना देणार बस डेपोत पार्क करण्याची 'ड्युटी'
* मलेरियातील 'फॉल्स पॉझिटिव्ह' चाचणीत निदान चुकीचे होत असल्याने चाचण्या करणारे किट केंद्र सरकारने केले रद्द
* नागपुरची संत्री आणि फळे आता विमानतळावर होणार उपलब्ध
* चेंगराचेंगरीनंतर बंद झालेला पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पूल जूनपासून प्रवाशांसाठी होणार खुला
* आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थी जाणार माऊंट एव्हरेस्टवर
* म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरी निघणार ०१ हजार घरांसाठी
* कर्नाटक विधानसभा निवडणूक: भाजपची ७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
* रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान कार्यालयात बैठक, मुख्यमंत्री राहणार उपस्थित
* नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादी पैशाच्या जोरावर सेना संपविण्याचा डाव खेळत आहेत, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही- खासदार चंद्रकांत खैरे
* पंतप्रधान दलित आणि बाबासाहेब आंबेडकरांबाबत नेहमीच बोलतात, पण रोहित वेमुलासह इतर दलितांच्या हत्येबाबत बोलले नाहीत-राहुल गांधी
* पंतप्रधान नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला चांगले ओळखतात, मात्र त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत चकार शब्दही काढत नाहीत- राहुल गांधी
* काँग्रेस, समाजवादी आणि बसपा हिंसाचाराला पाठिंबा देऊन देशातील शांतता भंग करत आहेत- केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद
* दलित महिलेशी विवाह केला, कानपूर येथे १९ वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या
* सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 'नासा'चे पार्कर सोलार प्रोब झेपावणार ३१ जुलै रोजी
* आयपीएलः कोलकाता नाइट रायडर्सचा रॉयल चॅलेंज बेंगळुरूवर ०४ गडी राखून विजय


Comments

Top