HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात फाशी, असिफासाठी कँडल मार्च, आरोग्य यंत्रणा संपावर, सोनिया अमेठीत-मोदी स्वीडनमध्ये, साखर अन ऊसाचे होणार वांदे, साक्षी महाराजांचे नाईट क्लब.......१७ एप्रिल २०१८

लातुरात फाशी, असिफासाठी कँडल मार्च, आरोग्य यंत्रणा संपावर, सोनिया अमेठीत-मोदी स्वीडनमध्ये, साखर अन ऊसाचे होणार वांदे, साक्षी महाराजांचे नाईट क्लब.......१७ एप्रिल २०१८

* लातुरात क्वाईलनगरात घेतली एकाने फाशी, प्रकरण संदिग्ध कुणी बोलेना
* उदगीर, निलंगा, देवणी येथील बसस्थानकांची होणार पुनर्बांधणी, निधी मंजूर
* कथुआ आणि उन्नाव येथील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काल रात्री कॉंग्रेसने काढला मेणबत्ती मार्च
* औसा नगरपालिकेच्या गाळ्यांचा होणार पुनर्लिलाव
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कामगार गेले संपावर
* उद्या बसवेश्वर महाविद्यालयासमोर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत बसव जन्मोत्सव सोहळा
* लातुरच्या कापड लाईन भागातील तृप्ती साडी सेंटर चोरट्यांनी फोडले, रोख ६८ हजार आणि सात साड्यांची लूट
* सोनिया गांधी आजपासून दोन दिवस अमेठी दौऱ्यावर
* पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वीडनमध्ये भव्य स्वागत
* पुणे जिल्ह्यातील केळवण येथे आजपासून संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची चिंतन बैठक, मोहन भागवतांसह ८० प्रतिनिधी राहणार उपस्थित
* राज्यातील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका लावणारे पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली
* रिलायन्स आता देणार डीटीएच सेवा, जिओ होम टीव्हीद्वारे कमीत कमी किंमतीत दिसणार एसडी आणि एचडी वाहिन्या
* स्फोटक पदार्थसह दोन जणांना कल्याणमध्ये अटक
* कोतकर, ठुबेंच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही- शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे
* माझा नवरा शिवसेनेसाठी शहीद झाला, हत्या करणाऱ्यांना सोडू नका- वसंत ठुबे यांच्या पत्नीची मागणी
* केडगाव ह्त्याकांड: एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याने दगडफेकीचा गुन्हा मागे घेण्यासाठी वर्षावर होणारे ठिय्या आंदोलन शिवसेनेने केले स्थगित
* पुढील वर्षी साखरेला २५०० रुपयेपर्यंतच दर मिळणार, केंद्रानं ठरवलेला ऊसदरही देणं होणार अवघड - शरद पवार
* घटनेत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत, सरकारने याबाबत निर्णय घेण्यासाठी २० मे रोजी पंढरपूर येथे राज्यव्यापी मेळावा
* शिवसेना-भाजपच्या युतीच्या प्रस्तावाची बैठकीस उद्धव ठाकरे यांचा तुर्तास नकार
* मुंबईतील परळ येथे आई- वडीलांना त्यांच्याच फ्लॅटमधून हुसकावून लावणार्‍या मुलगा व सुनेलाच घर सोडून जाण्याचा न्यायालयाचा आदेश
* औरंगाबाद येथे दुचाकीचा धक्का लागल्यावरून सहायक पोलिस निरीक्षकाला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
* यवतमाळ जिल्ह्यात शेतात पऱ्हाटीची चिता पेटवून शेतकर्‍याची त्यात झोकून आत्महत्या
* दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या नवीन एक्स्प्रेस वेची नितीन गडकरी यांनी केली घोषणा, ०१ लाख कोटी येणार खर्च
* पुण्यात मुलगीच जन्माला येईल असे म्हणत विवाहितेच्या पोटात आणि पाठीत लाथा मारून गर्भपात करण्याचा प्रयत्न, पती, सासू, नणंदेवर गुन्हा
* नालासोपारात डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत आढळल्या जिवंत अळ्या, पाकिटावर ०८ महिने पुढची एक्स्पायरी डेट, मसाल्याच्या पाकिटालाही बुरशी
* कठुआ बलात्कार प्रकरणः खटला राज्याबाहेर चालवण्याची मृत मुलीच्या कुटुंबीयांची मागणी, कुटुंबाला सुरक्षा देण्याचे आदेश, सुनावणी २७ एप्रिलला
* कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरण: जीवाला धोका असल्याचे पीडित मुलीच्या वकील दीपिका सिंह राजवंत यांचे म्हणणे
* हैदराबाद मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरण: काँग्रेस व एमआयएमनं निकालासाठी एनआयएला ठरविलं दोषी
* बॉम्बस्फोटानंतर 'भगवा आतंकवाद' शब्दप्रयोग करणारे पी. चिदंबरम यांच्यावर खटला भरा- सुब्रमण्यम स्वामी
* राहुल गांधी किंवा काँग्रेसने कधीही 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केलेला नाही- काँग्रेस प्रवक्ते पीएल पुनिया
* भाजप खासदार साक्षी महाराज यांनी लखनौमध्ये केले एका नाइट क्लबचे उद्धाटन
* दारुबंदीच्या गुजरातमध्ये राजस्थानहून महागडी दारू आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघडकीस
* २०१९ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर अमेठीत हिंदुस्तान पेपर मिल आणि फूड पार्क बनवणार- राहुल गांधी
* केरळमधील पलक्कड जिल्ह्यात दोन दिवसच्या नवजात मुलीला आई-बापाने दवाखान्याच्या टॉयलेटमध्ये केले फ़्लश
* व्होडाफोन आणि आयडिया यांच्या विलिनीकरणानंतर ०५ हजार कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी
* व्होडाफोन आणि आयडियाचे २१ हजार कर्मचारी, दोन्ही कंपन्यांवर ०१ लाख २० हजार कोटीचा कर्जाचा बोजा
* बेनामी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाची ५० हजार जणांना नोटिस
* म्युच्युअल फंड नॉमिनी, प्राप्तिकर न भरणारे, रिअल इस्टेट विक्री करणारे परदेशस्थ भारतीय, नोटाबंदीत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांचा समावेश


Comments

Top