HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजप-सेनेचे साटेलोटे, हापूस कमी, नऊ राज्यात चलन टंचाई, पीएम मशीद बांधणार का? रेल्वे तिकिटांवर मराठी नावे, ६२ हजार कोटींचे घोटाळे......१८ एप्रिल २०१८

भाजप-सेनेचे साटेलोटे, हापूस कमी, नऊ राज्यात चलन टंचाई, पीएम मशीद बांधणार का? रेल्वे तिकिटांवर मराठी नावे, ६२ हजार कोटींचे घोटाळे......१८ एप्रिल २०१८

* लातूर शहरात सात ठिकाणी उन्मळून पडली नऊ झाडे, बराच काळ वीज गायब
* आज महात्मा बसवेश्वरांची जयंती, लातुरच्या बसवेश्वर चौकात मुख्य ध्वजारोहण
* माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख यांचा आज वाढदिवस, शुभेच्छांचा पाऊस
* पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा पुन्हा शोध सुरु
* जॉन अब्राहमच्या ‘परमाणू’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर
* यंदा आंब्याची आवक कमी, हापूस सर्वांना मिळणे अशक्य
* येत्या २४ तासात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता
* पुण्यात आंबा महोत्सव सुरु, विना रसायनाचा आंबा मिळतोय स्वस्तात
* शेतकरी आत्महत्यांशी सरकारला काहीच देणे घेणे नाही- शिवसेना
* प्रवीण तोगडियांचे अहमदाबादेत उपोषण सुरु
* नऊ राज्यात चलन टंचाई, एटीएम पुन्हा कोरडे!
* १३ दिवसांत तीन पटीने अधिक रोख रक्कम काढल्याने एटीएममध्ये चलन तुटवडा
* महिन्याला २० हजार कोटी काढले जातात, या महिन्यात १५ दिवसांत काढले ४५ हजार कोटी
* सरकारकडे रोख रकमेची कमतरता नाही, ०२ लाख कोटीचे भांडार असल्याची माहिती
* रोख रकमेचा तुटवडा तीन दिवसांत दूर करण्यात येईल- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
* बँकेच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, नोटा छपाईचा वेगही वाढविला- रिझर्व्ह बँकेचा खुलासा
* पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्लीतील कबीर कला मंचच्या घरांवर छापे
* पंतप्रधान मोदी आज इंग्लंडमध्ये, पंय्तप्रधान आणि महाराणींची घेणार भेट
* सलमान खानला परदेशात जाण्याची मिळाली परवानगी, कॅनडा, अमेरिका आणि नेपाळला जाणार
* जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या सर्व ०९ मंत्र्यांनी दिले राजीनामे
* भीम आर्मीचे आज सकाळी नवी दिल्लीत संसद मार्गावर आंदोलन
* मुल्यांकनात पात्र ठरलेल्या कायम विनाअनुदानीत मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय
* राज्यात चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना
* मुंबई पोलीस दलातील ०१ हजार १३७ पदांसाठी ०२ लाखाहून अधिक अर्ज, डॉक्टर, वकील, एमबीए आणि इंजिनीयर पदवीधारकांचेही अर्ज
* भाजपशासित छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अॅट्रॉसिटीचा सुधारित कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू
* संसदेत १५ मिनिटं बोलण्याची संधी द्या, मी बोलायला लागलो तर मोदी संसदेत थांबूच शकणार नाहीत- राहुल गांधी, अमेठीत
* बाबरी मशीद बांधण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत काय?-प्रविण तोगडिया
* हिंदुंनी प्राण त्याग केला, रक्त सांडवलं म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली, पोलिसांना सांगून ३०० हिंदुंना ठार केलं होतं, हे विसरलात का?- तोगडिया
* सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करताना दलितांसाठी आरक्षण ठेवा- रामविलास पासवान
* केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पाठलाग केल्याप्रकरणी ०४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
* पत्रकारीतेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार मिळाला रॉयटर्सला
* कौटुंबिक हिंसाचार प्रकरण: क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांनी पाठवले समन्स
* ट्विटर संध्याकाळी अचानक बंद पडल्यामुळे युजर्स सापडले अडचणीत, तांत्रिक बिघाड झाल्याचा संदेश झळकत होता साइटवर
* नाणार प्रकल्पाला सेनेचा विरोध म्हणजे भाजपशी केलेले साटेलोटे, हे भाजप-सेनेचे ‘मॅच फिक्सिंग’- राधाकृष्ण विखे पाटील
* विश्वास पाटील यांच्या काळातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ३३ प्रकरणांची चौकशी राहणार सुरूच- गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर
* राज्यात रेल्वे तिकिटावर सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानकांची नावे छापणार मराठीत, महाराष्ट्र दिनापासून अंमलबजावणी करण्याची योजना
* मुंबईच्या डब्बेवाल्यांना आराम मिळावा यासाठी सेनेने केले पाच ई- सायकलींचे वाटप
* विदर्भवाद्यांचा ०१ मे रोजी 'विदर्भ मार्च', मार्चनंतर विधानभवनावर फडकाविणार विदर्भाचा झेंडा
* अल्पवयीन मुलींच्या अपहरण घटनांमध्ये १५ पट वाढ, हरवलेल्या अल्पवयीन मुलां-मुलींचा वापर अनैतिक कृत्यांसाठी केला जाण्याची भीती
* राज्य सरकारमधील मंत्र्याने ट्विटवरुन मांडलेली भूमिका अधिकृत मानावी का? - उच्च न्यायालय
* अॅमेझॉनवरून स्मार्टफोन खरेदी करण्यात महाराष्ट्र आघाडीवर
* उत्तराऐवजी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी थोपटले महिला पत्रकाराच्या गालावर
* कथुआ आणि उन्नाव बलात्कार आणि हत्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी मौन पाळल्याबद्दल मनमोहन सिंग यांची टीका
* देशातील विविध बँकांमध्ये गेल्या तीन वर्षांत ६२ हजार कोटींहून अधिक घोटाळे- रिझव्‍‌र्ह बँक


Comments

Top