HOME   महत्वाच्या घडामोडी

येदीयुराप्पा तिसर्‍यांदा मुख्यमंत्री, पण कोर्टात काय होणार?

येदीयुराप्पा तिसर्‍यांदा मुख्यमंत्री, पण कोर्टात काय होणार?

बंगलोर: कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने पुन्हा येदीयुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. येदीयुराप्पा यांना हा मान तिसर्‍यांदा मिळाला असून बंगलोरमध्ये अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. पण मामला कोर्टात गेलाय. येदीयुराप्पा यांच्या शपथविधीला परवानगी देऊ नये अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर रात्री दोन वाजता सुनावणी सुरु झाली. ती पाचपर्यंत चालली. राज्यपालांच्या कामकाजात कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही असे सांगत कोर्टाने त्यास स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे भाजपाने आज सकाळी नऊ वाजता येदीयुराप्पा यांचा शपथविधी उरकून घेतला. उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. तुम्हाला ०८ सदस्य कमी पडतात, ते कुठून आणणार? आणि आणले तर ते योग्य ठरणार नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने बहुमतासाठी आवश्यक सदस्यांची यादीही मागवली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. पण एवढा अवधी देणे योग्य नाही, ही लोकशाही मुल्ल्यांची पायमल्ली आहे, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांची यादी कोर्टाला दिल्यास भाजपाची अडचण होणार आहे. न दिल्यासही अडचण होणार आहे. शिवाय पक्षांतरबंदी कायद्याचं काय? पाठिंबा देणार्‍या इतर सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करुन भाजपाला पाठिंबा दिला तर तोही लोकशाहीचा अवमान ठरणार आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.


Comments

Top