HOME   महत्वाच्या घडामोडी

येदीयुराप्पांनी दिला राजीनामा, कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री, शिक्षणासाठी आत्महत्या, जी श्रीकांत शेततळे, पोलिसांविरुद्ध मोर्चा, उद्धव ठाकरे यांचा मोर्चा, मोदी लाट कायम?.......१९ मे २०१८

येदीयुराप्पांनी दिला राजीनामा, कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री, शिक्षणासाठी आत्महत्या, जी श्रीकांत शेततळे, पोलिसांविरुद्ध मोर्चा, उद्धव ठाकरे यांचा मोर्चा, मोदी लाट कायम?.......१९ मे २०१८

* बहुमत चाचणीआधीच येदीयुराप्पांनी दिला राजीनामा, कर्नाटकात भाजपाची हार!
* तीन दिवसात भाजपाचं सरकार पडलं, आमदारांची पळवापळवी अपयशी, बहुमत सिद्ध करण्यात अपयश
* कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
* कर्नाटक विधानसभेचा हंगामी विधानसभेचा अध्यक्ष नेमण्याचा अधिकार भाजपालाच- सर्वोच्च न्यायालय
* कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरु
* बोपय्या प्रकरणामुळे कॉंग्रेस अडचणीत
* कर्नाटक विधानसभा अध्यक्ष बोपय्या यांच्या नियुक्तीवर कॉंग्रेसचा आक्षेप
* या आक्षेपावरील निर्णय झाल्याशिवाय बहुमत चाचणी होणार नाही- सर्वोच्च न्यायालय
* बोपय्या प्रकरणामुळे बहुमत चाचणी अनपेक्षित काळ लांबू शकते!
* मुरुडजवळच्या गावातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार, आरोपींना सोलापुरातून अटक
* लातूर जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांवर बारदान्याअभावी हरभरा खरेदी बंद
* पाण्याच्या शोधात १६ हरिणांचा कळप हाळी हंडरगुळीत शिरला, दोन जखमी
* १९ वर्षाखालील लातूर जिल्हा क्रिकेट संघाची रविवारी दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात निवड
* कर्नाटक सरकारच्या विरोधात लातूर कॉंग्रेसने केली गांधी चौकात निदर्शने
* औसा तालुक्यातील एकंबीवाडीत ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलेल्या शेततळ्याला दिले जिल्हाधिकार्‍यांचे नाव
* जिल्हाधिकार्‍यांनी लातुरात घरोघरी जाऊन केली नळाच्या पाण्याची तपासणी
* जिल्हाधिकारी म्हणतात पाणी पिण्यास योग्य, पिऊनही दाखविले
* मुलांच्या शिक्षणाचा खर्च असह्य झाल्याने बीड जिल्ह्यात मातेची आत्महत्या
* यंदा मोसमी पाऊस तीन दिवस आधी येणार
* औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित असल्याचा पोलिस प्रशासनाचा अहवाल
* जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सहा हजार गावे करणार दुष्काळमुक्त- मुख्यमंत्री
* कर्नाटकात जो न्याय दिला तोच न्याय गोवा विधानसभेतही द्या, कॉंग्रेसची मागणी
* विदर्भातील उष्णतेची लाट अद्यापही कायम
* लोणावळ्यातील संग्रहालयात रामदास आठवले यांचा मेणाचा पुतळा, मुख्यमंत्र्यांनी केले उदघाटन
* औरंगाबादेत आज शिवसेनेचा पोलिसांच्या विरोधात मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारली
* दोन वर्षात सरकार भरणार ७२ हजार सरकारी पदे
* बुलेट ट्रेन विरोधात पालघरमध्ये मोर्चा उद्धव ठाकरेही होणार सहभागी
* ज्येष्ठ लेखिका मघला गोडबोले यांच्यावर चार भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, अनेक ठिकाणी चावे
* मोदींची लाट कायम, वाढते आहे, एका पाहणीचा अहवाल
* क्युबात विमानाला अपघात १०० जणांचा मृत्यू
* ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि हॉलीवूड अभिनेत्री मेघन मर्केलचा आज शाही विवाह, प्रियंका चोप्रा राहणार हजर
* कर्नाटकात विधानसभेत आज भाजपची बहुमत चाचणी
* कर्नाटकात कॉंग्रेस, जेडीएसच्या आमदारांची खबरदारी, संरक्षणात आणले बंगलोरमध्ये
* भाजप आमदार केजी बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती, कॉंग्रेस पुन्हा सुप्रीम कोर्टात
* कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या संपर्कात भाजपचे तीन आमदार!
* दोन आमदारांचे अपहरण झाल्याचा जेडीएसच्या कुमारस्वामी यांचा दावा
* लोकमंगल कंपनीकडून निधीचा गैरवापर झाल्याचा सेबीचा स्पष्ट आरोप
* पालघर लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सात अभ्यासक्रमांच्या परीक्षा पाच दिवस लांबणीवर
* अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू
* दुधाला प्रतिलिटर किमान २५ रुपये दर न दिल्यास संबंधित दूध संघांना अनुदान मिळणार नाही
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा छत्तीसगडमधील दुर्ग येथे रोड शो
* औरंगाबादेत एअरहोस्टेस म्हणून नोकरी देण्याचे प्रलोभन देऊन तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
* नागपूर विमानतळावरून दिल्लीसाठी विशेष जम्बो विमान सेवा सुरू


Comments

Top