logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. विक्रम काळेंसह पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले

आ. विक्रम काळेंसह पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले

नवी दिल्ली: पंचायतराज समितीच्या महाराष्ट्रातील पाच आमदारांवर आज काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील बिचबिहारी तालुक्याच्या ठिकाणी अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यातून पाचहीजण सुखरुप बचावले, मात्र रस्त्यावरील सात ते आठ नागरिक जखमी झाले. आमदारांसोबत असलेले बाकी वीसहीजण सुखरुप आहेत. ही घटना तातडीने काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना कळवण्यात आली. त्यांनी तातडीने अतिरिक्त सुरक्षा पोचवली. त्यानंतर सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विक्रम काळे यांच्या सोबत दीपक चव्हाण, सुधीर पारवे, तुकाराम काते, सुरेशअप्पा पाटील हे चौघेजण होते. हल्ला झाला त्यावेळी टायर फुटल्याचा संशय आला पण लोकांच्या ओरडण्यामुळे काही वेगळे घडल्याचा अंदाज आला. लोक सैरावैरा पळत होते. त्यांच्यापैकी सात ते आठ जण जखमी झाले होते. त्यानंतर हा अतिरेक्यांचा ग्रेनेड हल्ला होता असे लक्षात आले. आम्ही सारे सुखरुप आहोत असे आ. काळे यांनी सांगितले. या घटनेत गाड्यांचे टायर फुटले, गाडीच्या काचा तडकल्या अशीही माहिती मिळाली आहे.


Comments

Top