logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   महत्वाच्या घडामोडी

सुरेश देशमुख पराभूत, स्वामींची आज बहुमत परिक्षा, गनिमी कावाची पाणी परिषद, नाव शिवरायांचे वर्तन अफजलखानाचे, कर्नाटकात होणारी कर्जमाफी, लिनीच्या पतीला नोकरी......२४ मे २०१८

सुरेश देशमुख पराभूत, स्वामींची आज बहुमत परिक्षा, गनिमी कावाची पाणी परिषद, नाव शिवरायांचे वर्तन अफजलखानाचे, कर्नाटकात होणारी कर्जमाफी, लिनीच्या पतीला नोकरी......२४ मे २०१८

* अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी
* परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी
* पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस
* पेट्रोल-डिझेलवर सबसिडी दिल्यास विकास कामे अशक्य- नितीन गडकरी
* छगन भुजबळ यांच्यावर लिलावतीत उपचार सुरु
* समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
* मुरुड मार्गावर पेटत्या कारमध्ये भाजल्याने शिक्षिका मिनाकुमारी बनसोडे यांचं निधन, पतीला अटक
* महिनाभरापूर्वी व्यापारी बन्सीलाल भराडिया यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेंपोचालकास अटक, गुन्हा कबूल
* हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्राचे अभियंता डीडी बिराजदार यांची उचलबांगडी, विजय चोळखणे यांची नियुक्ती
* लातूर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी महेशकुमार मेघमाळे यांची नियुक्ती
* गनिमी कावा संघटनेतर्फे २९ मे रोजी लातुरात पाणी परिषद, राजेंद्रसिंह राणा करणार उदघाटन
* मनाला पटले नाही म्हणून निवडणुकीतून माघार घेतली, पंकजाताईंची भेट, राष्ट्रवादीशी संपर्क नाही- रमेश कराड
* बारदाना संपल्याने नाफेडची लातुरातील हरभरा खरेदी झाली बंद
* विधानपरिषदेच्या उस्मानाबाद, बीड, लातूरच्या जागेची मतमोजणी लांबणीवर
* विधानपरिषदेच्या पाच मतदारसंघाची मतमोजणी आज होणार
* आ. विक्रम काळे यांच्यासह पाच आमदार काश्मिरात अतिरेकी हल्ल्यातून बचावले
* तारिणी नौकेतून विश्वपरिक्रमा करणाऱ्या सहा महिला नौदल अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
* शिवसेना नाव घेते शिवरायांचं वागते अफजलखानासारखी, योगी आदित्यनाथ यांची पालघर निवडणुकी टीका
* औरंगाबाद जिल्हा बॅंकेतील नोकरभरतीची चौकशी करण्याचे आदेश
* कर्नाटक विधानसभेचे सत्र २५ मे रोजी दुपारी १२.१५ वाजता सुरु होणार
* कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसचे जी.परमेश्वर यांनी घेतली उप मुख्यमंत्रीपदाची शपथ
* कर्नाटकातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणार, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची घोषणा
* कुमारस्वामींच्या शपथ सोहळ्यास कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षनेते एकाच मंचावर
* कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पंतप्रधानांनी दिल्या फोनवरुन शुभेच्छा
* आ. निरंजन डावखरे यांनी दिला राष्ट्रवादीचा आणि आमदारकीचा राजीनामा, भाजपात जाणार
* भारतीय नौदलाची पुढील महिन्यात बांगलादेशसोबत संयुक्तपणे गस्त : नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा
* उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेनगरची तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी
* नक्षलग्रस्त भागांत चार हजार बहात्तर मोबाईल टॉवर्स उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* औरंगाबाद दंगल प्रकरणी तपासासाठी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांची नियुक्ती
* शासकीय निवासस्थान सोडण्यापूर्वी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावं लागणार
* दरम्यान, पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
* उस्मानाबाद जिल्हा यंदा ठरला टॅंकरमुक्त, लातूर आणि बीड जिल्ह्यात किरकोळ संख्येत टॅंकर्सने पाणी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ मे रोजी पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दौऱ्यावर
* केरळात ‘निपाह’च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नर्स लिनीच्या पतीला सरकारी नोकरी आणि मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा


Comments

Top