HOME   महत्वाच्या घडामोडी

लोकनेत्याला अभिवादन, सीएम एक्स्पोज्ड बाय सेना, मान्सून आला अंदमानात, उद्योगांसाठी अभय योजना, तरंगते क्रूझ हॉटेल बुडाले, कुलभूषण मिळणार नाही......२६ मे २०१८

लोकनेत्याला अभिवादन, सीएम एक्स्पोज्ड बाय सेना, मान्सून आला अंदमानात, उद्योगांसाठी अभय योजना, तरंगते क्रूझ हॉटेल बुडाले, कुलभूषण मिळणार नाही......२६ मे २०१८

* लोकनेते विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त हजारोंनी केले बाभळगावात अभिवादन
* लातूर बाजार समितीने सुरु केली शेतकर्‍यांसाठी पाच रुपयात भरपेट जेवण योजना, आ. अमित देशमुख यांनी केले उदघाटन
* विलासरावांच्या जयंतीनिमित्त विलास साखर कारखान्यावर रक्तदान आणि वृक्षारोपण
* औरादमध्ये आढळले डेंग्यूचे तीन संशयित रुग्ण
* लातूर जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या विविध ठिकाणी बदल्या
* मुंबई ते गोवा क्रूझ सेवा सुरु, सात हजाराला तिकिट
* पालघर पोटनिवडणुकीत पैसे वाटताना शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पकडले, गुन्हा दाखल
* गुड न्य़ूज.....मान्सून अंदमानात दाखल, दोन दिवसात कोकण किनारपट्टीवर
* आज लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती, बाभळगावात प्रार्थना सभा, विविध उपक्रमांचे आयोजन
* उद्या नरेंद्र मोदी यांची ४४ वी ‘मन की बात’
* केंद्रातल्या मोदी सरकारला आज झाली चार वर्षे पूर्ण, अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
* मोदी सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ
* साम, दाम, दंड, भेद सगळ्या गोष्टींचा वापर करा, उद्धव ठाकरे यांनी सादर केली मुख्यमंत्र्यांची ध्वनिफित
* मुख्यमंत्र्यांची ध्वनिफित निवडणूक आयोगाला करणार सादर
* वीज पुरवठा तोडलेल्या उद्योगांसाठी अभय योजना, व्याज आणि विलंब शुल्क माफ करणार
* नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलीची शिवसेनेची घोषणा फसवी- मनसे
* दुधाला २७ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उत्पादकांचे ०१ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन, सर्व तहसीलना घेराव
* वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरंगते क्रूझ हॉटेल बुडाले, कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
* सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा आज निकाल, १२ लाख विद्यार्थी
* कनिष्क ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक भुपेश कुमार यांना ईडीकडून केली अटक, ८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
* कुलभूषण जाधवला भारताकडे सोपवले जाणार नाहीः पाकिस्तान
* महिला पोलीस शिपाई ललिता साळवेवर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया
* कर्जमुक्ती आणि इतर मागण्यासाठी शेतकर्‍यांचा ०१ जूनपासून देशव्यापी संप, १३० संघटना सहभागी होणार
* अहमदनगर जिल्ह्यातील एका ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
* इंधन दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईलः पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन.
* कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे विजयी
* ईदच्या सुट्टी दरम्यान पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी
* नाशिचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेनी केल्या पालिकेतील २२ अभियंत्याच्या बदल्या
* केरळात निपाह विषाणुमुळे मृतांची संख्या वाढली, आजवर ११ जणांचा मृत्यू
* मुंबईत ४.९३ कोटींच्या जुन्या नोटा जप्त; ३ जण अटकेत


Comments

Top