HOME   फोटो फिचर

गटारात निघाला तीन ट्रॅक्टर कचरा........

गटारात निघाला तीन ट्रॅक्टर कचरा........

कचरा व्यवस्थापनाचं काम नवीन संस्थेला दिल्यापासून कचर्‍याच्या अनंत भानगडी समोर येत आहेत. कचरा जाळणे, मुबलक कचर्‍यामुळं सांडपाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था कोलमडणे, अनेक ठिकाणी गटारी नसल्याने होणारी अडचण, असं बरंच काही समोर येऊ लागलं. परवा मुस्लीम विकारषदेचे मोहसीन खान यांनी मित्रनगरातील कचरा जमवून महापालिकेला भेट दिला. त्यानंतर आज काम सुरु झालं. पोस्ट ऑफीसच्या बाजुला असलेल्या गल्लीत माजी नगराध्यक्ष व्यंकटराव बेद्रे यांच्या घरापासून जवळपास पोस्ट ऑफीस पर्यंतची गटार अनेक वर्षात काढली नव्हती. ती आज सकाळी सातपासून काढणं सुरु झालं. पावणे अकरापर्यंत यात दोन ट्रॅक्टर कचरा निघाला. तिसरं ट्रॅक्टर भरणं सुरु होतं. कदाचित चार ट्रॅक्टरही भरु शकतात.

Comments

Top