HOME   फोटो फिचर

दहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार?

दहा वाजून दहा मिनिटांनी घड्याळ थांबणार?

लातूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, प्रयोगशील नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून गुळ मार्केटच्या चौकात एक मोठे घड्याळ बसवण्यात आले आहे. सध्या सगळ्यांनाच धावपळ असल्याने सारखे घड्याळ्याकडे बघावे लागते. त्यासाठी मोटारसायकल किंवा स्कूटरच्या क्लचवरचा किंवा ब्रेकवरचा हात उचलून घड्याळ बघण्याची कसरत करावी लागते. त्यापेक्षा गुळ मार्केटच्या चौकात सिग्नल आणि घड्याळही पाहणे सोपे झाले आहे. बघणारे मात्र काहीही बोलतात. निवडणुकीचे दिवस जवळ आले आहेत. हे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांवर येऊन तर थांबणार नाही ना?

Comments

Top