HOME   फोटो फिचर

वरद तुगावकर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

वरद तुगावकर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

लातुरच्या केशवराज विद्यालयाचा सातवीतील विद्यार्थी वरद तुगावकर याची राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी १४ वर्ष वयोगटाखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. याबद्दल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. निलंगेकर यांनी त्याला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. इंदौर येथे ता. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार्‍य़ा राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत तो महाराष्ट्राच्या संघातून खेळणार आहे. या वेळी पॅकर्स क्रिकेट क्लबचे उल्हास भोयरेकर, नगरसेवक संगीत रंदाळे, मोहसीन शेख, संतोष देवडे, पत्रकार अरुण समुद्रे आदी उपस्थित होते.

Comments

Top