Online Newspaper with Latest Video News From Latur
  Home | Video News | Latest News | Latur News | Latur Bazar | Photogallery | Video Gallery | Contact |  
 
 
 
माझं लातूर
 
आजा मेरी गाडी मे बैठ जा ....  
आपला निवडणूक आयोग अडचणीत आलाय. पेच भलता वेगळा आहे. मुंबईतल्या किवसेना आणि फनसे या दोन पक्षांनी एकच निवडणूक चिन्ह मागितलंय. ऑटोरिक्षा ! या दोघांनाही निवडणूक चिन्ह बदलून हवंय आणि ते सुध्दा, ऑटोरिक्षाच हवंय. मुंबई ठाण्यातल्या रिक्षेवाल्यांनी नागरिकांची अडवणूक सुरु केली म्हणून या दोघांनाही राग आलाय. लोकांनी आपली अडचण बोलून दाखविण्याआधीच त्यांना कळवळा येतो. दोघांनीही लोककल्याणाचा वसा घेतल्यानं मुंबईकर खूष आहेत. या दोघांनी सुरु केलेल्या कल्याणकारी कामांमुळं मुंबईत रामराज्य आलंय. पण या मुंबईत फक्त ऑटोरिक्षाचालक नावाचे रावण आहेत. या रावणांना सरळ करण्याचा विडा या दोघांनाही उचललाय. सुरुवात कुणी करायची यावर त्यांचं नक्की ठरेना. पहले आप पहले आप करीत वाट बघत बसले. त्यांची वाट बघून बघून कंटाळलेल्या कुणीतरी रिक्षावर पहला पत्थर फेकला. त्याचा गवगवा चॅनलवाल्यांनी करताच सगळ्यांना रिक्षावाल्यात रस वाटू लागला. पहला पत्थर किसने फेंका याचं उत्तर अजून मिळालेलं नसलं तरी हमने फेंका असं फनसे सांगते. फनसेचा गवगवा बघून लोकांना किव आलेल्या किवसेनेलाही हा पत्थर आपणच फेकला याचा साक्षात्कार झाला. मग सुरु झाली पत्थरबाजी. दोघांनी दावे केले पण पत्थर के सनमचं नाव मात्र सांगितलं नाही. दोन्ही पार्ट्या गुन्ह्याची कबुली देतात पण पोलिस मात्र कारवाई करण्यासाठी त्या रिक्षाचालकाची वाट पाहतायत. तो मात्र काहीच बोलत नाही. उद्या धंद्यावर पाणी फिरलं तर फनसे जेऊ घालणार नाही आणि किवसेना भीक मागू देणार नाही. या वांद्यात मात्र दोन्ही पार्ट्यांनी त्या फुटलेल्या रिक्षा हायजॅक केल्यात आणि दोघंही मतदारांना म्हणतायत ..... आजा मेरी गाडी मे बैठ जा, आजा मेरी गाडी मे बैठ जा !! लॉंग ड्राईव्ह जायेंगे, शिववडा खायेंगे, कहीं रुकेंगे ना हम, गाना बजाना, खाना पिना गाडी मे होगा सनम .... आजा मेरी गाडी मे बैठ जा, आजा मेरी गाडी ए बैठ जा !!



 
  आणखी बातम्या  
आजा मेरी गाडी मे बैठ जा ....
गुरुजी, शाळंत घ्या ना मला !!
सो जा भालू, शीला चली गयी ...
पुढच्या वर्षी लवकर या ! कशाला ?
मेंटल हॉस्पीटल टू विरेचन, दिग्गीराजांचं पंचकर्म!
राळेगणच्या जंगलात लालूंना चारा, अण्णा आरक्षण द्या आरक्षण !!
कहो मै टॉपलेस हूं ...
ओम पुरी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
राहुलभाई समोसेवाले !!
गुस्सा कुर्सी का !! साईबाबांची जनलोकपाल अंगठी
भ्रष्ट अधिकार्‍यांचा नवा फंडा, तीन माकडं !!
बाबांना वरमाला अन अण्णांना राखी, योग टू भोग, सावंतांच्या राखीचा प्रवास !!
सिंहाच्या घरात सर्वे.... ९९ जण गॅसवर
एक सिंह आणि १०८ उंदीर
कचरे को रहने दो, कचरा ना उठाओ
आमाला काकटेल चालतं बरं का !!
कंडोमऐवजी थ्री जी कार्डाचं वाटप, कामसूत्र फेल !!
रामभाऊ जरा मुंबईकडं बघा !!! सरकाररुपी सितेची अग्नी परिक्षा रोज घेऊ नका !!!
     
GET THE LATEST NEWS ON YOUR MOBILE WITH SAMWAD SMS NEWS SERVICE
Call Now : 9922612300
देश-विदेश
  लातूर न्यूज
  फॉर्मविना चालतं लातूरचं आरटीओ कार्यालय !!  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : लातूरच्या परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी लागणारे वेगवेगळे फॉर्म उपलब्ध नसल्यानं सविस्तर >>  

  नव्या तंत्रानं पत्रकारिता सक्षम करणार - रवींद्र जगताप  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : संवाद एसएमएस न्यूज सेवा, आजलातूर डॉट कॉम हे पहिलं व्हिडीओ सविस्तर >>  

  सुभाष घई, इज्जत गई, वाजवा टाळ्या !!  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : कधी काळी आक्रमकरित्या रस्त्यावर येऊन आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता सविस्तर >>  

  अपडेट ...... २२ फेब्रुवारी  
  * औरंगाबादेत १२ वीच्या परिक्षेत कॉपी करणार्‍या २२ जणांवर कारवाई * कृपाशंकर सिंह यांचा मुंबई प्रदेश सविस्तर >>  

  अपडेट ....... २१ फेब्रुवारी  
  * लातूरचे माजी नगरसेवक आबा दुधभाते यांचं निधन * लातूर मंडळांतर्गत नांदेड ७०, लातूर ७७ आणि सविस्तर >>  

  संदीप अंकलकोटेंना शोधवार्ता पुरस्कार  
  लातूर दि. २१ फेब्रुवारी : उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने विभागीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण वसंतदादा सविस्तर >>  

  आजपासून १२ वीच्या परिक्षा  
  लातूर दि. २१ फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यातील ७७ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून १२ वीच्या परीक्षेला प्रारंभ सविस्तर >>  

  सिध्देश्वराच्या झेंड्याची मिरवणूक आणि शोभायात्रा  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : आज सिध्देश्वर यात्रेला पारंपारिक पध्दतीनं सुरुवात झाली. पहाटे गवळी समाजानं सविस्तर >>  

  गोलाईजवळ पुन्हा आग, खानावळ भस्मसात  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : काल गंजगोलाईत आगीच्या तांडवानं 52 छोट्या दुकानांचा बळी घेतला. आज सविस्तर >>  

  गवळी समाजाच्या अभिषेकानं सिध्देश्वर यात्रेची सुरुवात  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : लातूरचं ग्रामदैवत सिध्देश्वर रत्नेश्वराच्या यात्रेला आज सुरुवात झाली. मध्यरात्री 12 सविस्तर >>  

 
  शिवजयंती ते भीमजयंती, 89 गावे हागणदारीमुक्त करणार ....  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : शिवजयंती ते भीमजयंती या कालावधीत निर्मल स्वराज्य मोहिम राबवून 89 सविस्तर >>  

  डोस पोलिओचा, सुदृढ प्रकृतीचं अमृत ...  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर लाखो बालकांनी सुदृढ प्रकृतीचं अमृत अर्थात पोलिओचा सविस्तर >>  

  अपडेट .... १९ फेब्रुवारी १२  
  * लातूरच्या गंजगोलाईत ५२ टपर्‍यांना आग, लाखोंचं नुकसान * गोलाईतल्या आगीचा प्रशासनानं केला पंचनामा * लातूरात ऊस सविस्तर >>  

  गोलाईत अवैध वीज कनेक्शनच फेस्टीवल!  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : आज पहाटे तीनच्या सुमारास गंजगोलाईत लागलेल्या आगीत चपलांची 52 छोटी सविस्तर >>  

  गंजगोलाईत आग, चपलांची 52 दुकाने खाक  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेत आज पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत चप्पल-बुटांची सविस्तर >>  

  सिध्देश्वर यात्रेत बचत गटाचे स्टॉल्स  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : दारिद्य्र रेषेखालील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी या सविस्तर >>  

  10 वी, 12 वी परिक्षांसाठी हेल्पलाईन  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या सविस्तर >>  

  सिध्देश्वर यात्रेत संगीत, नृत्य आणि शास्त्रीय गायन  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : लातूरातील सिध्देश्वर यात्रा 20 तारखेला सुरु होत आहे. या निमित्तानं सविस्तर >>  

  लोकांनीच उध्वस्त केलं गोरोबा सोसायटीतलं अतिक्रमण  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : लातूरच्या नांदेड मार्गावर आज जनतेचा रुद्रावतार पहायला मिळाला. या मार्गावर सविस्तर >>  

  रोड फेस्टीवल : पहा मिनी मार्केट  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : व्यापाराच्या, शिक्षणाच्या, राजकारण्यांच्या आणि सर्व प्रकारच्या लातूरच्या विकासात लातूरच्या रस्त्यांचं सविस्तर >>  

 
 
जाहिरात
लातूर बाजार
 
 
 
  व्हिडिओ गॅलरी  
Third Media | First Video News Portal Latur
 
This site is best viewed in 1024x768 pixel with Internet Explorer 8.0 or above | website powerd by : way2websolution.net