logo

HOME   फोटो फिचर

फुलांचा बाजार उघड्यावर, घाणीत अन रस्त्यावर....

फुलांचा बाजार उघड्यावर, घाणीत अन रस्त्यावर....

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजी बाजाराला लागूनच फुलांचाही बाजार भरतो. या ठिकाणी ठोक विक्री होते आणि पुन्हा छोटे व्यावसायिक आपापल्या जागेवर जाऊन किरकोळ विक्री करतात. लातुरात नेमके उलट आणि विचित्र चित्र आहे. लातुरात फुलांच्या ठोक बाजाराला जागाच नाही. रिगल सिनेमाच्या समोर असलेल्या मनपाच्या संकुलातील तळमजल्यावर हा बाजार भरतो. या जागेवर कुणाचेही नियंत्रण नाही. या ठिकाणी सगळ्या प्रकारची घाण केली जाते, नको त्या भानगडी घडत असतात. पावसाळ्यात या तळ मजल्यात पाणी जमते. तेव्हा फुलांचे शेतकरी, ठोक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना अतुल फुटवेअरच्या समोरील जागेत किंवा भर रस्त्यावरच बाजार मांडावा लागतो.

Comments

Top