HOME   फोटो फिचर

मनसेचा नवा झेंडा फडकतोय जोमाने

मनसेचा नवा झेंडा फडकतोय जोमाने

बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर मनसेनं आपली भूमिकाही बदलली. शुद्ध भगवा जवळ करीत नवा झेंडाही जन्माला घातला. या झेंड्यावरुन राजकीय टीकाही झाली. काही ठिकाणी तर शिवभक्तांनी नव्या झेंड्यावरील शिवमुद्रेला आक्षेपही घेतला. पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली. पण असल्या आक्षेपाला जुमानणारे राज ठाकरे ते कसले? त्यांनी झेंडा वापरात आणला. लातुरात मनसेचं कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात या झेंड्याचा मुबलक वापर चालू आहे. दर्शनी भागात हे झेंडे डौलाने फडकत आहेत.

Comments

Top