logo

HOME   फोटो फिचर

सरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र......

सरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र......

लातुरचा सरकारी दवाखाना म्हणजे आताचं सर्वोपचार रुग्णालय. या दवाखान्याच्या परिसरांत डुकरांचं राज्य आहे. या दवाखान्याला जेव्हा आमदार, खासदार, मंत्री किंवा बड्या भेट देतात तेव्हा ही डुकरे कुठे असतात कळत नाही. पण इतर वेळी ती राजरोस फिरत असतात. जेव्हा जेव्हा म्हणून या रुग्णालयाला भेट देण्याचा प्रसंग येतो त्या प्रत्येक वेळी संख्या वाढलेली दिसते. कारण प्रत्येक वेळी डुकरीणीच्या मागे पिलांचा कळप फिरत असतो. सर्वोपचार म्हणजे सर्व रोगांवर किंवा सर्व प्रकारच्या नागरिकांवर उपचार असे नव्हे. तर भटक्या प्राणीमात्रांनाही इथे आधार मिळत असतो!
तुम्ही पाहताय ते छायाचित्र आहे मनोविकार उपचार विभाग आणि शवविच्छेदन विभागाच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेवरचं.

Comments

Top