HOME   फोटो फिचर

वॉल्व फुटू नये म्हणून दगडांचं संरक्षण!

वॉल्व फुटू नये म्हणून दगडांचं संरक्षण!

काल परवा सावेवाडी आणि खोरी गल्लीत पाणी मिळत नाही म्हणून नवा वॉल्व बसवण्यात आला. त्याचं टेस्टींग केलं गेलं नाही. आज थेट पाणी सोडण्यात आलं. पाणी येताच नवा वॉल्व उडून पडला. पाणी वाया गेलं. कुणालाही मिळालं नाही. ते लगेच बंद करण्यात आलं. संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी ठिय्या दिला. मग अकरानंतर फिटर आणि अभियंता आले. त्यांनी तो वॉल्व परत जोडला. हा वॉल्व पुन्हा निसटू नये यासाठी दगडांनी तो दाबून ठेवला. एवढं करुनही पुन्हा पाणी सोडल्यावर त्यातून चिळकांड्या सुरु झाल्या. पुन्हा पाणी बंद करण्यात आलं! आता पुढे काय होते याची प्रतिक्षा आहे....

Comments

Top