HOME   फोटो फिचर

डिव्हायडरमध्ये अवतरले देव, अपघात थांबले!

डिव्हायडरमध्ये अवतरले देव, अपघात थांबले!

लातूर-बार्शी मार्गावर हरंगुळकडे वळताना डिव्हायडर संपतो. पण या ठिकाणी कसलीच खूण नाही की इंडीकेटरही नाही. त्यामुळे बार्शीकडून येणारी अनेक वाहने या डिव्हायडरवर चढायची. अपघात व्हायचे. आता हा प्रकार थांबला आहे. कारण बार्शीकडून येणार्‍या वाहनांना डिव्हायडरमधील देव दिसतात. देवांना लावलेला शेंदूर दिसतो. तो चमकतो आणि वाहनचालक सावधान होतात! या देवांमुळंच हा चमत्कार घडला असल्यानं या देवाला नीट नेटकं बसवावं. त्यावर एखाद्या छत्रीची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व्यंकट पनाळे यांनी केली आहे.

Comments

Top