• 20 of March 2018, at 1.08 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   फोटो फिचर

आता बिनधास्त जा संडासला.......

आता बिनधास्त जा संडासला.......

स्वच्छ भारत मोहिमेसाठी पाहणी होणार आहे हे कळताच लातूर मनपाने अनेक ठिकाणी शौचालये उभारली. अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीमागे पाच शौचालये उभारण्यात आली, रात्रीतून गुलाबी रंगाने रंगवण्यात आली. काही दिवस अडलेल्या नागरिकांनी त्याचा फायदा घेतला पण १५ दिवसातच त्यांच्या दारांची वाट लागली. बुक्कीत तुटणारी दारं या ठिकाणी लावण्यात आली होती. त्यामुळं इथं सोय आहे म्हणून खात्रीनं आलेल्या-अवघडलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. परवा स्वच्छ भारत समितीचे प्रतिनिधी आले होते ते पाहणी करणार होते. म्हणून लगबगीने लोखंडी पत्र्यांची दारे बसवण्यात आली. आता बिनधास्त या शौचालयात जायला हरकत नाही. दारं बसलीत. ‘लाभार्थीं’पर्यंत ही बातमी जायला हवी!

Comments

Top