HOME   फोटो फिचर

आज वंचितचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता....

आज वंचितचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता....

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सत्ता संपादन रॅलीनिमित्त टाऊन हॉलच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयएमशी काडीमोड झाल्यानंतर बाळासाहेबांची ही पहिलीच सभा आहे. या सभेत बाळासाहेब वंचितचा उमेदवार घोषित करतील अशी अपेक्षा केली जात आहे. तसे झाल्यास बाकी पक्षांच्या व्यूह रचनेला वेग येणार आहे. केवळ कॉंग्रेसचा लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार निश्चित असल्याने बाकी पक्षात अजून चाचपणीच सुरु आहे. युतीचीही घोषणा बाकी आहे. युती न झाल्यास शिवसेना भाजपाची मते विभागली जातील असा अंदाज आहे. वंचितची आघाडी फुटल्याने कॉंग्रेसमध्ये काहीसा आनंद आहे.

Comments

Top