HOME   फोटो फिचर

भिणार नाही, माझ्या पाठीशी आहेस?

भिणार नाही, माझ्या पाठीशी आहेस?

बीएसएनएल या तत्पर आणि शुद्ध सेवा देणार्‍या सरकारी टेलीफोन कंपनीचं कंपनीचं खाजगीकरण होणार आहे अशी चर्चा आहे. अर्थातच बॅंक कर्मचार्‍यांप्रमाणं या कंपनीतल्या कर्मचार्‍यांचाही त्याला सक्त विरोध आहे. यासाठी सुटीच्या वेळेत किंवा कार्यालय संपल्यानंतर हे कर्मचारी आंदोलनही करीत असतात. परवा गांधी चौकातल्या टेलीफोनच्या कार्यालयात जाण्याचा योग आला. आत गेल्याबरोबर एक दालन लागते. या दालनात बाकी थोरामोठ्यांची छायाचित्रे नाहीत पण स्वामी समर्थांचं चित्र दिसलं. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे या समर्थांच्या एका वाक्यावर भक्तांना मोठं बळ मिळतं. बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांना असंच वाटत असावं!

Comments

Top