HOME   फोटो फिचर

प्रदीप राठींच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस..

प्रदीप राठींच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस..

विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत आमदार अमित देशमुख यांनी लातूर अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्रदीप राठी यांच्या उद्योग भवन येथिल गीता भवन निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमदार देशमुख यांनी आस्थेवाईकपणे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन घेतले. यावेळी रमेश राठी, सुभाष देवणीकर, समय राठी, निखील राठी, रमेश बियाणी, मोईज शेख यांच्यासह राठी कुटुंबीय उपस्थित होते.

Comments

Top