HOME   फोटो फिचर

आमदार देशमुख आणि डॉ. जनार्दन वाघमारे यांची गळाभेट..

आमदार देशमुख आणि डॉ. जनार्दन वाघमारे यांची गळाभेट..

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. अमित देशमुख यांनी माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या लातूर शहरातील श्रम साफल्य सोसायटी या ठिकाणी असलेल्या आविष्कार निवासस्थानी भेट दिली. गळाभेट झाली. या भेटी दरम्यान आमदार अमित देशमुख आणि उपस्थित प्रतिष्ठित, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यात विधानसभा निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यंकट बेद्रे, संतोष देशमुख, अशोक गोविंदपुरकर, विवेक सौताडेकर, जगन्नाथ पाटील यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Comments

Top