HOME   फोटो फिचर

पत्रकार संघात दर्पण दिन, आद्य पत्रकार जांभेकरांना अभिवादन

पत्रकार संघात दर्पण दिन, आद्य पत्रकार जांभेकरांना अभिवादन

आज दर्पण दिन, पत्रकर दिन, बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले होते. या निमित्ताने लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, अध्यक्ष नरसिंह घोणे, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे, दीपरत्न निलंगेकर, सचिव सचिन मिटकरी यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी उपस्थित पत्रकारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव कुंभार, मार्गदर्शक चंद्रकांत झेरीकुंटे, प्रांत प्रतिनिधी त्र्यंबक कुंभार, प्रभाकर शिरुरे, महादेव डोंबे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जांभेकरांना अभिवादन करण्यात आलं.

Comments

Top