HOME   फोटो फिचर

पिवळ्या पट्ट्या गायब, पोलिसच घालू लागले जामर.......

पिवळ्या पट्ट्या गायब, पोलिसच घालू लागले जामर.......

काही महिन्यांपूर्वी लातू शहरातील रस्त्यांवर दोन्ही बाजुंना काही अंतर सोडून पिवळे पट्टे मारले गेले. या पिवळ्या पट्टीच्या बाहेर वाहनाचा कुठलाही भाग आला तर ते वाहन खेचून नेले जात असे. अशी बरीच वाहने संबंधित एजन्सीने ‘उचलल्या’मुळे जराशी शिस्त येऊ लागली होती. पण कालांतराने हे पट्टे फिके पडत गेले, काही ठिकाणी तर पिवळा रंगही दिसत नाही. त्यामुळे पुन्हा वाहने बेशिस्तपणे लावणे सुरु झाले. अनेकांना पट्टेच दिसत नसल्याने वाहने जमेल तशी लावली जाऊ लागली. आज सम्राट चौक ते गुळ मार्केट रस्त्यावर सागर मोटर्सजवळ पोलिसांनी अशा प्रकारे दुचाकींना जामर लावले!

Comments

Top