HOME   फोटो फिचर

शौचालयांवर विद्युत रोषणाई......

शौचालयांवर विद्युत रोषणाई......

स्वच्छ भारत मोहिमेत नंबर मिळवायचाच या इर्षेने पेटलेल्या लातूर महापालिकेनं अनेक प्रयत्न चालवले आहेत. नांदेड मार्गावर नवी शौचालयं बांधली. त्यानंतर अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीमागे पाच शौचालये उभारण्यात आली. या ठिकाणी तातडीने पाण्याची सोय करण्यात आली. आता जवळच्या खांबावर स्पेशल बल्ब बसवून या शौचालयांसाठी प्रकाशाची सोय करण्यात आली आहे. लातूर पोस्टासमोरची सतत घाण केलेली जागा काही कार्यकर्त्यांनी साफ करुन वाचन कट्टा उभारला. पाच सहा बाकडी बसवली. इथली लाईट मात्र बंद करण्यात आली. या अंधाराचा फायदा घेत काही मंडळी इथे पुन्हा घाण करण्याचा प्रयत्न करीत असतात.

Comments

Top