HOME   फोटो फिचर

मनपाच्या उरावर आसारामबापू!......

मनपाच्या उरावर आसारामबापू!......

१४ तारखेला व्हॅलेंटाईन डे झाला. याला अनेक स्तरातून विरोध आहे. तसाच आसारामबापूंचाही आहे. या दिवशी माता पिता दिन पाळावा, त्यांचे पूजन करावे असे आवाहन ते करतात. आता तरुण मुलांना हे किती आवडलं कितीजण माता पिता पूजनाला गेले हे माहित नाही पण या दिनाचं आवाहन करणारं पोस्टर बापूंच्या अनुयायांनी गांधी चौकात लावलं. सध्या स्वच्छतेचा सिझन चालू आहे. स्वच्छतेचं आवाहन करणारं एक पोस्टर महानगरपालिकेनं गांधी चौकात लावलं होतं. त्या पोस्टरवर बापुंच्या अनुयायांनी अतिक्रमण केलं. मनपाच्या पोस्टरवर आपलं पोस्टर लावलं. या चौकातून जाणारा एकजण थांबला, त्यानं ते बघितलं अन तो म्हणाला, पोस्टर लावणार्‍याच्या माता पित्यांना सलाम!

Comments

Top