HOME   लातूर न्यूज

लातूर वृक्ष महिला टिमकडून वासनगावात २५० वृक्ष लागवडीची सुरुवात

आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात, महिलांचे कौतुक


लातूर वृक्ष महिला टिमकडून वासनगावात २५० वृक्ष लागवडीची सुरुवात

लातूर: लातूर वृक्ष या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड, संगोपन व वृक्ष संवंर्धनाबाबत जनजागृतीचे कार्य करण्यात येत आहे. लातूर वृक्षच्या महिला टिमच्या वतीने शुक्रवारी वासनगाव येथे २५० वृक्ष लागवड व संगोपन उपक्रमाची सुरुवात माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आली. लातूर वृक्ष उपक्रमामध्ये महिलांनी सक्रीय सहभाग घेऊन या उपक्रमास लोकचळवळीचे स्वरुप दिले आहे असे मत आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. लातूर वृक्षच्या महिला टिमने वासनगाव येथे २५० वृक्ष लागवड व संगोपन करण्याची सुरुवात केली आहे. आगामी काळात निश्चितच वृक्ष लागवड व संगोपन मोठया प्रमाणात होऊन वासनगावातील नागरिकही या चळवळीत भाग घेतील असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप, पवन लड्डा, डॉ. भास्कर बोरगावकर, रमेश थोरमोटे, डॉ. गणेश पन्हाळे, रितेश बिसेन, कृष्णकुमार बांगड, डॉ. निलम जाधव पन्हाळे, डॉ. निता मस्के पाटील, डॉ. शितल गोंधळी, डॉ. जागृती खरटमोल, डॉ. वर्षा डोपे, डॉ. शितल रेड्डी, डॉ. श्रुती कोडगी, डॉ. किरण होळीकर, डॉ. अर्चना माने, वैभव डोळे, शुभम दुधाळे, अनुराधा अग्रवाल, शिला यादव, विकास माडकर आदिंची उपस्थित होती.


Comments

Top