logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   लातूर न्यूज

नाट्य संकुलास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव

लातूर मनपा सभेत झाला ठराव

नाट्य संकुलास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव

लातूर : महानगर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणार्‍या नाटय संकूलास सिने अभिनेते आणि नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला. मनपाच्या सर्व साधारण सभेत नियोजित नाट्यसंकुलास गोजमगुंडे यांचे नाव द्यावे असा ठराव नगरसेवक राजा मणियार यांनी मांडला. श्रीराम गोजमगुंडे यांचे कला क्षेत्रातील अलौकिक योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव संकुलास देण्याबाबत आग्रह धरण्यात आला. रविशंकर जाधव, कैलास कांबळे, दीपक सूळ, चाँदपाशा घावटी, आयूब मनियार, सपना किसवे, पूजा पंचाक्षरी, यूनुस मोमीन, इम्रान सय्यद, सचिन बंडापल्ले, उषा भडीकर, वर्षा मस्के, योजना कामेगावकर, विजय साबदे, गौरव काथवटे यांनी ठरावाच्या बाजूने संमती दर्शविली. भूमिपुत्राचा गौरव झाला पाहिजे असे मत अशोक गोविंदपूरकर यांनी मांडले. श्रीराम गोजमगुंडे यांच्या श्रध्दांजली सभेत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी याबाबत पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले होते. ठरावा नंतर ‍विक्रांत गोजमगुंडे यांनी महापौर, उपमहापौर व सदस्यांचे आभार मानले


Comments

Top