logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   लातूर न्यूज

आदर्श मैत्रीनं फाउंडेशननं ३०० गरिबांना दिली दिवाळी

रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या घरात पोचली मिठाई आणि दिवे

आदर्श मैत्रीनं फाउंडेशननं ३०० गरिबांना दिली दिवाळी

लातूर: आदर्श मैत्री फांऊडेशन लातुरच्या वतीने 'देणे समाजाचे' या उपक्रमांतर्गत या वर्षीची दीपावली अनाथ, गोर-गरीबांच्या घरी आपल्या आगोदर साजरी व्हावी. त्यासाठी 'पेपर रद्दी संकलन' करून त्यातून जमा झालेल्या पैशामधुन लातुर शहरातील कुष्टधाम,विजयनगर झोपडपट्टी, बाभळगाव रोड लगतचे झोपडीधारक अशा ३०० कुटुंबात घरोघरी जाउन आज दीपावली फराळाचे
बॉक्स वाटप करण्यात आले. ज्यांना वर्षाचे बारा महीने सारखेच, सण माहित ना उत्सव, आजचा आलेला दिवस कसा निघेल याची भ्रांत असते. अशा परिस्थितीत काहिजण आजारानेग्रासलेले, उपचारा आभावी अंथरुणात खितपत पडलेले, तर काहिजण मोडक्या झोपडीत लहान थोरासह रोजच जीवन व्यतीत करतात. इतके दुःख, दारिद्रय आसतानाही, ना कुणाकडे तक्रार नाही, ना काही मागणे नाही. खरोखरच या प्रसंगी तेथील वृद्ध पुरुष, महिला, लहान मुले यांच्या हातामध्ये मिठाई चे बॉक्स पडताच त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, अतुलनीय होता.
या प्रसंगी आदर्श मैञी फांऊडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, मकरंद जाधव, चंद्रकांत कातळे, ईश्वर बाहेती, विवेक सौताडेकर, डॉ. उत्तम देशमाने, राघवेंद्र ईटकर, अरविंद औरादे, राऊ सौदापुरे, अशोक तोगरे, आदीसह या उपक्रमास समस्त लातुरवासीयांनीही भरभरुन दाद दिली, शिवाय पेपरची रद्दी, मिठाई देउन आपला सहभागही नोंदवला. अवघ्या आठ दिवसात आदर्श मैत्री फांऊडेशन च्या संचालकाच्या अवाहानास इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल संयोजकांनी आभार मानले आहेत.


Comments

Top