logo

HOME   लातूर न्यूज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गोपीनाथ मुंडेंचे नाव द्या

भाजपा भटके विमुक्त आघाडीची मागणी, मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गोपीनाथ मुंडेंचे नाव द्या

लातूर: लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. गोपीनाथराव मुंडे हे दीन-दुबळे, भटके-विमुक्त, यांचे तारणहार होते. लातूरकरांशी त्यांची नाळ जुळलेली होती. लातूरच्या जनतेसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळेच लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुंडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर आघाडीचे प्रदेश सचिव पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष राम माने, शहर जिल्हाध्यक्ष शिवसिंह शिसोदिया, शहर उपाध्यक्ष सचिन निलापल्ले, मुन्ना हाशमी, साजिद इनामदार, गणेश बेस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Top