logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   लातूर न्यूज

मराठवाड्यात प्रथमच सॅनेटरी नॅपकिन प्रक्रिया प्रकल्प

महिला बचत गटाच्या मदतीने रेड डॉट कँपेन ला प्रारंभ

मराठवाड्यात प्रथमच सॅनेटरी नॅपकिन प्रक्रिया प्रकल्प

लातूर: महिलांना शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून सॅनिटरी नॅपकिन चा वापर वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असताना वापरलेले सॅनिटरी नॅपकीन नष्ट करण्याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परंतु आता लातूर शहर महानगरपालिकेने याकरिता प्रभावी यंत्रणा उभारत प्रभाग पाच मधील खत निर्मिती प्रकल्प परिसरात सॅनेटरी नॅपकिन इंसीनिरेटर मशीन बसविली आहे. याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. अशा पद्धतीची यंत्रणा उभारणारी लातूर मनपा ही मराठवाड्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.
वापरलेले सॅनिटरी नॅपकिन अनेकदा उघड्यावर अथवा नालीमध्ये फेकून दिले जातात, यामुळे परिसर प्रदूषित होतो व जंतुसंसर्ग रोगांमध्ये वाढ होते याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. वापरलेले सॅनेटरी नॅपकिन सुक्या कचऱ्यात एकत्र करून घंटागाडी मध्ये टाकले जातात. घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांना याचे उघड्या हातांनी विलगीकरण करावे लागते त्यामुळे त्यांना त्वचारोगासह इतरही गंभीर आजार उद्भवू शकतात. वापरलेले सॅनिटरी नॅपकिनचे नैसर्गिक विघटन होत नसल्याने हा कचरा कचरा डेपो येथे टाकला जाऊन कचऱ्याच्या मध्ये वाढ होत असते. घनकचरा व्यवस्थापनातील ही सर्वात मोठी समस्या ओळखून लातूर शहर महानगरपालिकेने मराठवाड्यात प्रथमच क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रायोगिक तत्वावर प्रभाग पाच मधील खत प्रकल्प येथे बसविण्यात आलेल्या मशीनद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने वापरलेले सॅनिटरी नॅपकीन नष्ट करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. याकरिता नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी अस्मिता महिला बचत गटाच्या मदतीने रेड डॉट कॅम्पेन राबवित मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून महिलांनी वापरलेले सॅनेटरी नॅपकिन पेपरमध्ये गुंडाळून त्यावर लाल रंगाची ठळक खूण करून घंटागाडीत बसवलेल्या टाकण्याचे आवाहनही केले जात आहे. त्यास महिला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.


Comments

Top