HOME   लातूर न्यूज

निवडणुकीत माध्यमांवर लक्ष ठेवणारी समिती नियुक्त

जिल्हाधिकारी अध्यक्ष, विविध मान्यवरांचा समावेश


निवडणुकीत माध्यमांवर लक्ष ठेवणारी समिती नियुक्त

लातूर: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची (MCMC) स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या समितीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागोराव कुंभार, बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी तानाजी इरले हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के त्यांची समितीचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दूरचित्रवाणी वाहिनी, केबल नेटवर्क याद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती संदर्भात तसेच मुद्रीत माध्यमांतील पेडन्यूज संदर्भात ही समिती काम करणार आहे. याअंतर्गत दूरचित्रवाहिनीवरील प्रसारित जाहिराती संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी हे प्रमाणीकरण बाबत निर्णय घेतील. तसेच समितीकडे पेडन्यूज व इतर तक्रारी प्राप्त झाल्यास सर्व समिती सदस्य तपासणी करुन निर्णय घेतील.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (MCMC) ची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत समिती सदस्य नागोराव कुंभार, जनसंपर्क अधिकारी तानाजी इरले, सहाय्यक निवडणूक अधिकारी (लातूर ग्रामीण) शोभा जाधव, समितीचे सचिव जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तसेच निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.जाधव हे उपस्थित होते. यावेळी काळे यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अंतर्गत MCMC समितीची रचना, कार्य व महत्व सांगून सर्व समिती सदस्यांचे समितीवरील निवडीबद्दल स्वागत केले. समिती अंतर्गत देण्यात आलेली कार्ये जबाबदारीपूर्वक पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्परांत योग्य समन्वय ठेवून काम करण्याची सूचना केली. यावेळी सदस्य कुंभार यांनी ही काही सूचना मांडल्या.


Comments

Top