HOME   लातूर न्यूज

अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस

हार, तुरे नको मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीला मदत करण्याचे आवाहन


अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस

लातूर: अल्पावधीत लातूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला जात आहे. सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत लातुरच्या निवासस्थानी ते शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी १२ ते सहा या वेळेत औसा येथील विजय मंगल कार्यालयात औसेकरांना शुभेच्छा देता येतील. आपण साधेच आहोत, साधेच राहू द्या, जन्मदिवसाला उत्सवाचं स्वरुप देणं आपणास मान्य नाही. हार, तुरे, ब~नर्स, पोस्तर्स, वर्तमानपत्रातील जाहिराती यावर खर्च करु नये, जमल्यास विद्यार्थ्यासाठी वह्या, पुस्तके, गणवेश, कंपास आदी शैक्षणिक साहित्य घेऊन या, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करा असे आवाहन अभिमन्यू पवार यांनी केले आहे. २२ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत केले जाणार आहे.


Comments

Top