HOME   लातूर न्यूज

पडीक जागेवर महिला डॉक्टर्सनी केले वृक्षारोपण

झाडे जगवण्याचा निर्धार, घेतली जोपासनेची शपथ


पडीक जागेवर महिला डॉक्टर्सनी केले वृक्षारोपण

लातूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका पडीक जागेवर दाट वृक्षांची वनराई बनविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ श्रीकांत गोरे, आयएमएचे सचिव डॉ. संतोष डोळे, महिला डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्याच्या संगोपनाचीही जबाबदारी वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी व महिला डॉक्टरांनी घेतली. या वृक्षांचा वाढदिवस पुढील वर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी 'पर्यावरण संरक्षणाची' शपथ घेतली.
लातूर वृक्ष चळवळी अंतर्गत जेष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब, चैतन्य हास्य क्लब, व्हीडीएफ फांउन्डेशन, आयएमए, ग्रीन फाँउन्डेशन, एस एम फाँउन्डेशन, ह्युमॅनिटी फांउन्डेशन, निमा, जिल्हा पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, परांजपे फांउन्डेशन, उमाटे क्लासेस, सनरीच, द्वारकादास शामकुमार, वाडा, वृंदा हॉटेल अशा विविध संस्थांना गेल्या चार वर्षांपासून 'वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा' कार्यक्रम हाती घेतला आहे. यंदा नवीन विविध टिकाऊ, औषधी आणि ऑक्सिजनची निर्मिती करणा-या झाडांची निवड करुन त्यांची लागवड करण्यात आली.
ही ५० झाडे महिला डॉक्टरांनी व लातूर वृक्षने उपलब्ध करुन दिली. त्यांचा आदर्श घेऊन आसपासच्या परिसरातील नर्सरीवाले किंवा संस्थानी पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक बांधिलकी ठेवून वृक्षदान करावे. वृक्षाची लागवड करून संगोपनाची जबाबदारी लातूर वृक्ष चळवळीच्या वतीने घेण्यात येणार आहे. यावेळी डॉ श्रीकांत गोरे, डॉ संतोष डोपे, डॉ अजय ओव्हाळ, डॉ किरण होळीकर, डॉ वर्षा डोपे, डॉ गीतांजली स्वामी, डॉ सुवर्णा आनंदवाडी कर, डॉ सोनल मैंदरकर, डॉ सत्यकला सोळुंके, डॉ संगीता अगळे, डॉ गीतांजली सुडके, डॉ शीतल गोंधळी, डॉ मनिषा पाटील, डॉ दीपा पुरी, डॉ वृषाली पाटील, डॉ दीपिका भोसले, डॉ वैशाली इंगोले, डॉ श्रुती पाटील, डॉ अंजु बदने यांनी झाडे लावली. लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, डॉ गणेश पन्हाळे, डॉ पवन लड्डा, डॉ बीआर पाटील, डॉ भास्कर बोरगावकर, हेमंत रामढवे, किशोर पवार, कपिल धावरे, प्रशांत मादरपल्ले, प्रकाश शेंडकर, प्रसाद पारसेवार, ज्ञानेश्वर मरे, शुभम पांचाळ, योगेश स्वामी, राहुल लोंढे, अरुण केंद्रे, उत्पत पलकुर्ते, तेजस जोशी यांनी श्रमदान केले.


Comments

Top