HOME   लातूर न्यूज

जिल्हयात सरासरी ९.०४ मि.मी. पावसाची नोंद

सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात, सर्वात कमी औसा तालुक्यात


जिल्हयात सरासरी ९.०४ मि.मी. पावसाची नोंद

लातूर: जिल्हयात ९०.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्हयाची पावसाची सरासरी ही ९.०४ इतकी आहे. तर आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या ११.८२ टक्के इतका असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हयात सर्वात जास्त पाऊस जळकोट तालुक्यात ३९ मि.मी. तर सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात ०.४३ मि.मी. इतका झाला. तर रेणापूर तालुक्यात पाऊस झाला नाही. जिल्हयात तालुकानिहाय पर्जन्यमान झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. (आकडेवारी मि.मी.मध्ये)
लातूर (१.००, ९०.०५), औसा (०.४३, ५१.१४), रेणापूर (००, ९७.००), उदगीर (४.१४, ८४.१४), अहमदपूर (३८.५०, १३८.५१), चाकूर (१.२०, ७३.६०), जळकोट (३९.००, ११८.५०), निलंगा (०.५०, ९०.२८), देवणी (२.३३,१२३.९७) व शिरुर अनंतपाळ (३.३३, ९०.६६)
जिल्हयाच्या दहाही तालुक्यातील पावसाचे प्रमाण ९०.४३ मि.मी. इतके असून त्याची एकूण सरासरी ९.०४ मि.मी. इतकी आहे. लातूर जिल्हयाची ०१ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ८०२.१३ मि.मी. इतकी असून आजपर्यंत झालेला पाऊस ९४.८४ मि.मी. इतका आहे. हे प्रमाण जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या ११.८२ टक्के इतके आहे.


Comments

Top