HOME   लातूर न्यूज

कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा

मराठवाडयासाठी आमदार अमित देशमुख यांची मागणी


कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा

लातूर: पावसाळ्यातील दीड महिना उलटून गेला तरी मराठवड्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, ढग आहेत पण पाऊस नाही, अदयाप खरीपाची पेरणी नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामूळे सलग दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विशेषत: मराठवाडयातील सर्वजण अगोदरच दुष्काळाने त्रस्त झाले आहेत. यावर्षी चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यासह सर्व घटक सुखावले होते. परंतु पावसाळा सुरू होवून ४५ दिवस उलटून गेले आहेत मात्र अदयाप पेरणी योग्य देखील पाऊस झालेला नाही. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. सध्याची निसर्गाची स्थिती पाहता आकाशात काळे ढग मोठया प्रमाणात आहेत मात्र पाऊस पडत नाही. या परिस्थितीत कृत्रीम पावसाचा प्रयोग राबविला तर तो नक्कीच यशस्वी होईल असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामूळे इतर बाबीप्रमाणे हा विषय प्रलंबित न ठेवता शासनाने तातडीने निर्णय घेवून यावर अमंलबजावणी करणे आवश्यक वाटते आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत घेवून कृत्रीम पावसाचा प्रयोग राबविणेबाबत आदेश दयावेत असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे त्यांनी या निवेदनाच्या प्रती महसुल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच कृषी मंत्री यांनाही पाठविल्या आहेत.


Comments

Top