HOME   लातूर न्यूज

सरकारच्या कामगिरीचे वस्त्रहरण कार्यकर्त्यांनी करावे

पदाधिकारी बैठकीत आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन


सरकारच्या कामगिरीचे वस्त्रहरण कार्यकर्त्यांनी करावे

लातूर: सत्तेवर येण्यापुर्वी आणि नंतरही विदयमान राज्यकर्त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे या सरकारवर समाजाचा एकही घटक खुष नाही. केवळ लोकांची दिशाभुल करून पून्हा सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या या मंडळीचे वस्त्रहरण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठक प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख केले.
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीचे आयोजन गुरूवार रोजी काँग्रेस भवन या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, सभापती ललीतभाई शहा, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चांदपाशा इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.व्ही.मोतीपोवळे, ॲड.विक्रम हिप्परकर, मनपा विरोधी पक्ष नेते ॲड दिपक सूळ, ताजोद्दीन बाबा, अशोक गोविंदपूरकर, विद्याताई पाटील, किशोर राजूरे, ज्ञानोबा घुमनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत बोलतांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात १५ ऑक्टोंबर दरम्यान विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यांची तयारी करणे काँग्रेस पक्षाचे सांघिक काम आहे. निवडणुक काळात प्रत्येक कार्यकर्त्यांने लोका पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या विश्वासाने पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली ती जबाजबदारी पार पाडून पक्षाच्या विश्वासास पात्र रहावे. हा लढाईचा काळ असून स्थानिक मुददयावर आणि शासनाच्या पाच वर्षाच्या नाकर्तेपणाचे वास्तव लोकापर्यत पोहोचवणे गरजेचे आहे. नुकताच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्याचे सांगण्यात येत आहे पण हा विस्तार नसून भृष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्रयाना बाजूला सारण्याचा प्रकार होता असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्विकारून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
उजनीच्या पाण्याचे काय झाले?
लातूरला उजनीचे पाणी देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? अठरा महिन्याची मुदत असलेली अमृत योजना तीन वर्ष का रखडली? नळाला दररोज पाणी देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? या सर्व खोटया आश्वासनाचा जाब काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालीकेतील सत्ताधाऱ्यांना विचारावा. जनतेला सोबत घेवून जनतेच्या प्रश्नावर लढा उभा करावा असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.


Comments

Top