HOME   लातूर न्यूज

समतावाद्यांनी एकत्र येण्याची गरज- अ‍ॅड. बळवंत जाधव

पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांना आंबेडकर चौकात श्रद्धांजली


समतावाद्यांनी एकत्र येण्याची गरज- अ‍ॅड. बळवंत जाधव

लातूर: प्रखर आंबेडकरवादी, थोर साहित्यिक विचारवंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना आंबेडकर चौकात आयोइत शोकसभेत अभिवादन करण्यात आले. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बळवंत जाधव होते. याप्रसंगी बोलताना जाधव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत निर्माण झालेली पोकळी राजा ढाले यांनी दलित पँथरची स्थापना करून भरून काढली. दलितांवरील अन्याय अत्याचार रोखण्याचे काम पँथर चळवळीने केले. त्या पँथर चळवळीत काम करण्याची संधी मला मिळाली. आज देशामध्ये जय श्रीराम म्हणून माणसांना मारलं जात आहे. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाला मोडीत काढण्याचे काम जर या देशात होत असेल तर आपण सर्व जण समतावाध्यानी भारतीय संविधान अबाधित राखण्यासाठी एकत्र यावे लागेल. बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही भूमिका पुढच्या काळात घ्यावी लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी विचार मंचावर केशव कांबळे, मोहन माने, रामराव गवळी, डीएस नरसिंगे, अनंत लांडगे, अशोकराव कांबळे, चंद्रकांत चिकटे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून राजा ढाले यांच्याही प्रतिमेस उपस्थितांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आपल्यामध्ये नैतिकता असण्याची गरज असून, समतेच्या आग्रहासाठी सर्वानी एकत्र येऊन बाबासाहेबांचा विचाराचा समतेचा रथ पुढे नेण्याची गरज अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगातून व्यक्त केली. प्रास्ताविक केशव कांबळे यांनी केले. श्रीहरी कांबळे, प्रवीण सोमठाणकर, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. डॉ. सुधीर अनवले, प्रा. श्रीहरी तलवारे, कॉ. विश्वंभर भोसले, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, बसवंतअप्पा उबाळे, गोविंद शिरसाठ, कुमार सोनकांबळे, प्रा. युवराज धसवाडीकर आदिनी मनोगत व्यक्त केले. या शोकसभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.


Comments

Top