HOME   लातूर न्यूज

लातूर शहरमधून राष्ट्रवादीला कुणीच उमेदवारी मागितली नाही!

सहा मतदारसंघातून केवळ १५ जणांनी दिल्या मुलाखती, सर्वात जास्त उदगीरमधून


लातूर शहरमधून राष्ट्रवादीला कुणीच उमेदवारी मागितली नाही!

लातूर: राष्ट्रवादीने आज विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. लातूर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे कुणीही उमेदवारी मागितली नाही. उदगीर मतदारसंघातून सर्वाधिक नऊ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. निलंगा, औसा आणि लातूर ग्रामीणमधून प्रत्येकी एकजण उपस्थित होता. अहमदपूरमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे. राणा जगजितसिंह पाटील आणि बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत विश्रामगृह येथे या मुलाखती पार पडल्या. याचवेळी वंचितच्याही मुलाखती सुरु होत्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमी आणि चारचाकी गाड्या भरपूर होत्या. तर वंचितचे कार्यकर्ते अधिक आणि गाड्या कमी होत्या.
राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणारे कार्यकर्ते आणि मतदारसंघ याप्रमाणे;
लातूर ग्रामीण: ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बावणे
अहमदपूर: आबासाहेब पाटील, पूनम बोडके पाटील, सोमेश्वर कदम
उदगीर: शिवराज तोंडचिरकर, योगेश उदगीरकर, संजय बनसोडे, ज्ञानोबा माकणीकर, सुशिलकुमार कांबळे, पुष्पा गायकवाड, नवनाथ गायकवाड, शिवाजी गायकवाड.
निलंगा: विनायक बगदुरे
औसा: शेख अफसर नवाबोद्दीन


Comments

Top