HOME   लातूर न्यूज

ज्येष्ठ राजकीय, सामाजिक नेते त्र्यंबकदास झंवर यांचे निधन

सृजनशिल, संयमी, परोपकारी राजकीय नेत्याला लातूरकर मुकले


ज्येष्ठ राजकीय, सामाजिक नेते त्र्यंबकदास झंवर यांचे निधन

लातूर: लातूर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि विकासात मोलाची भूमिका बजावणारे, सर्वांचे प्रिय काका, त्र्यंबकदास झंवर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सुमारे दीड वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लातुरच्या राजकारणात शांत, संयमी, सुस्वभावी, तेवढेच दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. लोकनेते विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. लातुरच्या अनेक विकास कामांत त्यांचा मोठा सहभाग होता. विकासासाठी झालेल्या महत्वाच्या आंदोलनात त्यांची भूमिका आणि वाटाही तोलामोलाचा होता. जलपुर्भरण, जलस्रोतांचं खोलीकरण, वृक्ष लागवड अशा कामात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. अलिकडे त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांच्या जाण्यानं लातूर जिल्ह्याची मोठी हानी झाली अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.


Comments

Top