HOME   लातूर न्यूज

युवक कॉंग्रेसच्या वतीने मतदार जनजागृती अभियान

नव्या मतदारांची नोंदणीही सुरु, युवक-युवतींचा प्रतिसाद


युवक कॉंग्रेसच्या वतीने मतदार जनजागृती अभियान

लातूर: मतदानाचा हक्क प्रथमच मिळालेल्या १८ वर्षावरील नवमतदार युवक-युवतीच्या नावाची नोंद मतदार यादीत व्हावी व मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान याबाबत नवमतदार युवक-युवती मध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील प्रभाग १६, १० आणि ०८ या प्रभागांमधील रहिवाशी असणारे व वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी उद्देशाने मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक उमेशराजे निंबाळकर, व अतुलजी वाघ, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, माजी उपनगराध्यक्षा खाजाबानू बुऱ्हाण, नगरसेवक आकाश भगत, सुनील पडले, श्रीकांत गरजे, अजय वागदरे, बालाजी झिपरे, बालाजी सोनटक्के, अँड. नेश रायकोडे, अभिषेक पंतगे, महंमद खान, जाफेर पटवेकर, नारायण साठे, जावेद शेख, नागेश बावगे, सय्यद तोहब, सुनील वाले, आलम आलुरे, शैलेश भोसले, अजयजी यादव, अखम मार्डीकर, पृथ्वीराज पवार, महेश शिंदे, विजयकुमार टाकेकर, अशोक अंधारे, मुन्नाभाई सिंह, किशोर सोमवंशी, विनोद टाकेकर, महेश शिंदे, जयराज शिंदे, विशाल वाकडे, चक्रधर सुरवसे, बालाजी शिंदे, विकी भालेराव, सतीश कांबळे, विपुल वाकडे, गजानन गोंदगे, आदित्य सरवदे, सुरज काळे, बाळू पाटोळे, फैसल गिड्डे, मेहबूब गिड्डे, राम गवळी, गोविंद राजपूत, ताजोद्दीन सय्यद, सोमेश शिंदे, महादू कसबे, संतोष पोतदार, बाळू पोटभरे, दयानंद पुंडे, सुरज कोळी, बापू विर आदी लातूर शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


Comments

Top