HOME   लातूर न्यूज

पदवी परीक्षा पद्धतीत बदल: एनएसयूआयची निदर्शने

विद्यार्थ्याना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा


पदवी परीक्षा पद्धतीत बदल: एनएसयूआयची निदर्शने

लातूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बीए, बीकॉम, बीसीए, बीएस्सी, बीसीएस यांसह अन्य पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात आला असून या पदवी अभ्यासक्रमातील बदलाच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय विद्यार्थी संघटनेकडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात लातुरात निदर्शने करण्यात आले.
पूर्वी ऐच्छिक विषयाचे दोन पेपर वेगवेगळ्या दिवशी घेतले जात होते. मात्र आता विद्यापरीषदेने ऐच्छिक विषयाचे दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा प्रचंड दबाव आला आहे, पूर्वी ऐच्छिक पेपरला दोन तास एवढा वेळ दिला जात होता आता ही वेळ यंदा दोन ऐवजी तीन तास दिली केल्याने विद्यार्थी अधिक संभ्रमात पडला आहे. एमसीक्यू पॅटर्न अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांत गोंधळ उडाला असून विद्यापीठ कुलगुरुनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता परंतु विद्यापरीषदेच्या बैठकीत घेतला गेलेला असा निर्णय विद्यार्थ्यांना धक्का देणारा असुन या निर्णयाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एनएसयूआय विद्यार्थी संघटनेकडून लातूर मधील दयानंद महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत विद्यापरिषदेसह विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. पदवी परीक्षेची बदललेली परीक्षा पद्धती रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेतल्या जाव्यात व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा एनएसयुआयकडून यावेळी देण्यात. या निदर्शने आंदोलनात एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शहराध्यक्ष रोहीत पाटील, ईम्रान सय्यद, रामराजे काळे, सूरज पाटिल, प्रविण भावाळ, शुभम जाधव, अभिषेक काल्लोरे, गजानन मोरे, रोहन शेळके, बाळासाहेब करमुडे, सारंग मेटे, गणेश दंडगुले, शुभम स्वामी, प्रमोद कदम, महेश देशमुख, कृष्णा भोपळे, वैभव कातळे, कृष्णा कन्हैया, सिद्धेश्वर साळुंके, यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी सहभागी झाले होते.


Comments

Top