HOME   लातूर न्यूज

२९ व्यावसायिकांचा पाणीपुरवठा तोडला

दोन दिवसात ०७ लाखांची पाणीपट्टी वसूल


२९ व्यावसायिकांचा पाणीपुरवठा तोडला

लातूर: लातूर शहरातील खाजगी व व्यावसायिक नळपट्टी थकबाकी असणाऱ्यांनी अद्यापपर्यंत पाणीपट्टी भरली नव्हती. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत अशा २९ व्यावसायिक नळधारकांची कनेक्शन तोडण्यात आली. दोन दिवसात ०७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली. पाणीपट्टी वसुली संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता, तरीही पाणीपट्टी न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढे ही कारवाई कडक करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी कर भरणा भरून लातूर महानगर पालिकेस सहकार्य करावे, कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Top