HOME   लातूर न्यूज

लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

२५० पेक्षा अधिक रुग्णालयात हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार


लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

लातूर: माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लातूरचे सुपुत्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ०७ व्या स्मृतीदिनानिमित्त लातूर शहर व जिल्ह्रात आयोजित विलासराव देशमुख आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्रातील २५० पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयात आयोजित केलेल्या या शिबीरात हजारो रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तपासणी आणि उपचाराचे कार्य सुरु होते.
राजकारणाला समाजकारणाचे साधन समजून लोकनेते विलासराव देशमुख यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद भरण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या स्मृतीदिनी लातूर श्हर व जिल्ह्रातील आमएमए, निमा, तंत्र वैद्यकीय, आर्युवेद, होमीयोपॅथीक, या वैद्यकीय संघटना आणि विलासराव देशमुख फाऊंडेश्न यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबीरात मिळणार्‍­या आरोग्य सेवा लक्षात घेता दरवर्षी या उपक्रमाचा प्रतिसाद वाढतो आहे. या वर्षी लातूर शहर आणि जिल्ह्रातील २५० पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांनी या शिबीरात सहभाग नोंदवला. या सर्व रुग्णालयांत ०१ ऑगस्ट २०१९ पासूनच नोंदणी सुरु करण्यात आली होती. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ हा वेळ रुग्ण तपासणीसाठी देण्यात आला होता. मात्र जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रात्री उशिरापर्यंत हे काम चालू होते. तपासणी केल्यानंतर काही रुग्णांना उपचारासाठी नंतरच्या तारखा देण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. या समाजपयोगी उपक्रमात ऐनवेळी काही रुग्णालयांनी सहभाग नोंदवला त्यामुळे सहभागी रुग्णालयांची आणि तपासणी करुन उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रात्री उशिरापर्यंत यांची संख्या नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. आरोग्य तपासणी आणि उपचार सुरु असताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, अभिजीत देशमुख यांनी अनेक रुग्णांलयांना भेटी दिल्या. विलासराव देशमुख आरोग्य शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णालयांचे प्रमुख तेथे सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचा­यांचे त्यांनी आभार मानले. त्याचबरोबर शिबीरात तपासणी व उपचारासाठी आलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आभार
विलासराव देशमुख आरोग्य शिबीरात लातूर शहर व जिल्हातील आमएमए, निमा, दंत वैद्यकीय, आर्युवेद, होमीयोपॅथीक, या वैद्यकीय संघटनांनी तसेच सर्व डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी व मदतनीस आदी सर्वांनी पुढाकार घेवून विलासराव देशमुख आरोग्य शिबीर यशस्वी केले. रुग्णांनीही त्यास मोठा प्रतिसाद दिला त्याबद्यल माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.


Comments

Top