HOME   लातूर न्यूज

किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनची पूरग्रस्तांना मदत

दहा लाखांचा माल जमा, सांगली-साताराकडे ट्रक होणार रवाना


किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनची पूरग्रस्तांना मदत

लातूर: कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन पुर्णपणे कोलमडून पडले आहे. घरातील सर्व साहित्य नष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बसवराजअप्पा वळसंगे यांच्या मार्गदर्नाखाली लातूर किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनतर्फे दहा लाखाच्या जीवनावश्यक वस्तू व्यापारी असोसिएशनचे सदस्य सांगली व सातारा जिल्ह्यात जाऊन वाटप करणार आहेत. पूरग्रस्तांसाठी संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुरग्रस्तांची गरज ओळखून व्यापार्‍यांना मदतीचे आव्हान केले असता अनेक व्यापार्‍यांनी सढळ हातानी मदत केली. यात किमान दहा लाखाचा माल जमा झाला असून त्याचे कीट बनवण्यात आले आहेत. साखर, गहू पीठ, तांदूळ, मसुरदाळ, तुरदाळ, चुरमुरे, मीठ, मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, मसाला, वाशिंग पावडर, पेस्ट, ब्रश, मेणबती, काडीपुडा, अगरबत्ती, झाडू-खराटा, फरसाण, चहा पावडर, सतरंजी, तेल पुडा, मच्छर कॉईल, क्रीम पॉकेट अशा प्रकारे २७ आवश्यक उपयोगी वस्तूंचा समावेश आहे. किराणा होलसेल असोशिएनचे अध्यक्ष बसवराज आप्पा वळसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश मित्तल, विशाल अग्रवाल, बबलू आग्रवाल, बसवराज मंगरुळे, रफीक नाना, राजेश मित्तल, निजामभाई, विनोद छाजेड, सचिन कोचेटा, अमोल कोचेटा आदींनी मेहनत घेऊन पूरग्रस्तना अधिकाधिक मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.


Comments

Top