HOME   लातूर न्यूज

दुष्काळ जाहीर करण्यासाठी औसा तहसीलला घेराव

उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने पालकमंत्र्यांबाबत नाराजी


दुष्काळ जाहीर करण्यासाठी औसा तहसीलला घेराव

औसा: ऑगस्ट महिना संपत आला तरी तालुक्यात अद्यापही पाऊस न झाल्याने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने औसा तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला.पालकमंत्र्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आंदोलनकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. मागील दोन तीन वर्षात तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे. यावर्षी तर अद्यापही पाऊस झालेला नाही. बहुतांश भागात पेरण्याही झालेल्या नाहीत. यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज गुरुवारी सहावा दिवस असतानाही प्रशासनाने त्याची दाखल घेतली नाही. पालकमंत्र्यांनीही दखल घेतली नाही. इतर सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला पण प्रश्न सोडवू शकणारे पालकमंत्री इकडे आले नाहीत. यामुळे निराधार संघर्ष समिती, दुष्काळ संघर्ष समिती, शेतकरी संघटना, बहुजन रयत परिषद, मनसे आदी संघटनांनी तहसील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यालयाला घेराव घातला. शहरातील व्यापारी, शाळा व महाविद्यालयांनीही बंद पाळून यात सहभाग घेतला.
निराधार संघर्ष समितीचे राजेंद्र मोरे, राजीव कसबे यांच्या पुढाकारात झालेल्या या आंदोलनात मनसेचे शिवकुमार नागराळे, रुपेश शंके, दगडूसाहेब पडिले, गणेश माडजे, चक्रधर पाटील, बहुजन रयत संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतलताई, शहराध्यक्ष रजनीकांत पाटोळे, दगडू बर्डे, मनोज लंगर, नवनाथ भोसले, भगवान माकणे, नागेश मुगळे, संपत गायकवाड, अमोल कांबळे, राजू कांबळे, पांडुरंग चेवले, तुळशीदास चव्हाण, अनिल चव्हाण, सचिन आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.


Comments

Top