HOME   लातूर न्यूज

सैनिक विधवांचा मालमत्ता कर माफ करा

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या सूचनांनी सर्वांच लक्ष वेधले


सैनिक विधवांचा मालमत्ता कर माफ करा

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले. तीव्र पाणी टंचाई असतानाही अर्थसंकल्पात याकरिता कसलीही तरतूद नसल्याने पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुष्काळामुळे नागरिक स्थलांतराच्या मानसिकतेत असताना राजकीय अनास्थेमुळे नागरिक भरडले जात आहेत. यासह अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी अभ्यासपूर्ण टीका केली तसेच मनपाचे उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सुचविल्या.
मनपा मालमत्ता कराबाबत लातूरकरांची दिशाभूल करत असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नव्याने आकारलेल्या मालमत्ता धारकांना केवळ पुढील आर्थिक वर्षापासून वसुली करता येते. तसेच मालमत्ता कराबाबत लवचिक भूमिका स्विकारत नैसर्गिक वाढ करावी व वाढीव दर तातडीने कमी करावेत अशी आग्रही मागणी केली. तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी जनतेच्या सूचनांचा समावेश केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
लातूर मनपा ठरेल देशातील एकमेव मनपा
सिमेवर देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना व शहीद विधवांना मालमत्ता करातून पूर्णपणे सुट देण्याचा प्रस्तावही विक्रांत गोजमगुंडे यांनी मांडला. याला मान्यता देत लातूर मनपा देशातील असा निर्णय घेणारी पहिली मनपा ठरेल असेही मत व्यक्त केले.


Comments

Top