HOME   लातूर न्यूज

डॉक्टरांच्या संघटनेनं पाठवली पूरग्रस्तांना मदत

आयएमएचा पुढाकार, औषधी आणि नवे कपडे रवाना


डॉक्टरांच्या संघटनेनं पाठवली पूरग्रस्तांना मदत

लातूर: इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएच्या वतीने सांगली, कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक औषधी तसेच नवीन कपड्यांची मदत नुकतीच रवाना करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत पुराने घातलेल्या थैमानाने लाखों लोकांचे संसार होत्याचे नव्हते झाले. आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. शेती, पैसा अडका, पशुधन असे सारे कांही गमावलेल्या पूरग्रस्तांना माणुसकीच्या नात्याने जे कांही सहकार्य करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न विविध स्तरांतून झाला. आयएमएच्या लातूर शाखेनेही याकामी पुढाकार घेतला असून पूरग्रस्तांसाठी आवश्यक ती औषधी तसेच नवीन कपड्यांची मदत नुकतीच पाठविण्यात आली. यासंदर्भात बोलतांना आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी सांगितले की, मिरज-सांगली येथील आयएमएचे सर्व पदाधिकारी पूरग्रस्तांना मदत करण्याकामी सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातूनच गरजुंना ही मदत पोहचवली जात आहे. लातूरकरांनी ज्यावेळी पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना केला, त्यावेळी मिरज-सांगलीकरांनी रेल्वेच्या माध्यमातून लातूरला पाणी पुरवठा केला होता. याची जाण सर्व सुजाण लातूरकरांना आहे. त्याची जाणीव ठेवूनच पूरग्रस्तांना अशा प्रकारची मदत पाठवण्याचा निर्णय आयएमएच्या लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला व त्यावर तात्काळ अंमलही केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. पूरग्रस्तांना ही मदत पाठवण्यात आली, त्यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव डॉ. संतोष डोपे, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ.सुरेखा काळे, डॉ
ओमप्रकाश भोसले, डॉ.सौ.दीपिका भोसले, डॉ दीपक दाडगे, डॉ अमीर शेख आदी डॉक्टर्स उपस्थित होते.


Comments

Top