HOME   लातूर न्यूज

विलास कारखान्याला आर्थिक व्यवस्थापनाचा पहिला पुरस्कार

नवी दिल्ली येथे प्रदान, आ. अमित देशमुख यांनी संचालक मंडळासह स्विकारला


विलास कारखान्याला आर्थिक व्यवस्थापनाचा पहिला पुरस्कार

लातूर: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी राज्यमंत्री, आ. अमित देशमुख यांनी नवी दिल्ली येथे स्विकारला. हा पुरस्कार सोहळा सीआयसीपीचे चेअरमन विजय पौल शर्मा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे दिलीप वळसे पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्वश्री केतन पटेल, कल्पपा आवाडे, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. सहकार आणि साखर उदयोगातील संस्थाच्या देशातील साखर कारखान्याची तुलना करुन पुरस्कार दिला जातो. यामध्ये विलास कारखान्याचे साखर उद्योगाच्या कामकाजात सर्वेात्कृष्ट प्रदर्शन ठरले आहे. कारखान्याने आसवनी, इथेनॉल, सहविजनिर्मिती, कंपोस्ट खत प्रकल्पाची केलेली उभारणी, ऊस वजन ते साखर वितरण कामाचे संगणकीकरण, ऊसाचे वेळेवर पेमेट, ऊस बील देणी थकीत नाहीत, विकास स्टाफींग पॅटर्न, लेखापरिक्षण वर्ग अ+ (अतिउत्तम), राष्ट्रीय पातळीवरिल तांत्रिक कार्यक्षमता, सिद्ध झाली आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासूनच विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे नेतृत्व व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या कुशल नियोजनाखाली यशस्वी वाटचाल करीत आहे. या कारखान्याच्या यशस्वी वाटचाली बद्दल विविध राज्य आणि देशपातळीवरील पारीतोषिकांनी गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांचा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविद बोराडे, प्रभारी कार्यकारी संचालक एस. व्ही. बारबोले, संचालक सर्वश्री रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, रविंद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, वलायतखॉ पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी साळूंके, रमेश थोरमोटे, जगदीश चोरमले, भारत आदमाने आदी उपस्थित होते.


Comments

Top